पुणे रेल्वे स्टेशन परिसरात दोन लाखांचे मेफेड्रॉन जप्त


रेल्वे स्टेशन परिसरात अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केले. त्याच्याकडून 2 लाखांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. इरशाद इकबाल सय्यद (वय 42, रा. येरवडा ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

अमली पदार्थाची विक्री करणारा साधु वासवानी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून इरशादला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2 लाखांचे मेफेड्रॉन, मोबाईल, दुचाकी असा 2 लाख 28 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, प्रवीण शिर्के, मारूती पारधी, पांडुरंग पवार, संदीप जाधव, विशाल दळवी, विशाल शिंदे, राहूल जोशी, मनोळ साळुंके, संदेश काकडे, योगेश मोहिते, नीतेश जाधव, रूबी अब्राहम यांच्या पथकाने केली.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: