महाराष्ट्रात मंगळवारी लसीकरणाचा उच्चांक; एकाच दिवशी 5 लाख 52 हजार नागरिकांना दिली लस


राज्यात आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. राज्यात मंगळवारी एकाच दिवशी 5 लाख 52 हजार 909 जणांचे लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करतानाच त्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे 2 कोटी 85 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभरात 5 लाख 52 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. रात्री 8 वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी 26 एप्रिल रोजी एकाच दिवशी 5 लाख 34 हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: