करोना लस घ्या, नाहीतर तुरुंगवासाची शिक्षा; ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींची धमकी


हायलाइट्स:

  • करोना लस न घेणाऱ्या नागरिकांना तुरुंगात धाडण्याची धमकी
  • फिलीपाइन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी दिली धमकी
  • फिलीपाइन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत

मनिला: आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे फिलीपाइन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी करोना लस न घेणाऱ्या नागरिकांना तुरुंगात धाडण्याची धमकी दिली आहे. फिलीपाइन्समध्ये डेल्टा वेरिएंटचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. फिलीपाइन्समध्ये अलर्टही जारी करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री दुतेर्ते यांनी भाषणात म्हटले की, लोकांसमोर आता दोन पर्याय आहेत. एक तर लस घ्या अथवा तुम्हाला मी तुरुंगात धाडणार. तुम्हाला काय हवंय याची निवड तुम्हीच करायची आहे, असे दुतेर्ते यांनी म्हटले.

वाचा: करोना लस डेल्टा वेरिएंटवर किती परिणामकारक?; WHO चे तज्ज्ञ म्हणतात…

फिलीपाइन्समध्ये मार्च महिन्यात करोना लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र, फारच कमी प्रमाणात नागरीक लस घेत असल्याचे वृत्त समोर आले. लोकांना फायजरची लस मिळण्यास अडचणी येत असल्याची चर्चा आहे. करोना लस न घेणाऱ्या ‘मुर्खां’मुळे चिडलो असल्याचे राष्ट्रपती दुतेर्ते यांनी म्हटले.

वाचा: करोना लसीकरणात चीन सुस्साट; १०० कोटींहून अधिक डोस दिले

गोळी मारण्याचे दिले होते आदेश

याआधी, मागील वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी फिलीपाइन्समध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यावेळी लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना गोळी मारण्याचे आदेश दुतेर्ते यांनी दिले होते. त्यानंतर लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या काही नागरिकांवर सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली होती.

पाहा व्हिडिओ: इस्रायलची कमाल; लेझर गनने हवेतच पाडले ड्रोन विमान!

कतारमध्ये भारतीय शिष्टमंडळाची तालिबानसोबत गुप्त बैठक?

रक्तरंजित संघर्षाशिवाय पर्यायच नाही; चीनला थेट युद्धाची धमकी
लशीसाठी अमेरिकेलाही दिली होती

करोना लशीसाठी दुतेर्ते यांनी अमेरिकेलाही धमकी दिली होती. अमेरिकेने करोना लशीचा पुरवठा न केल्यास त्यांच्यासोबतचा लष्करी करार रद्द करणार असल्याची धमकी त्यांनी दिली होती.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: