चायना मांज्याने गळा चिरला, दुचाकीस्वार युवतीचा मृत्यू


दुचाकीने घरी जात असताना चायना मांजा गळ्यात अडकल्यामुळे 23 वर्षीय युवतीचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात मृत्युला जबाबदार असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सुत्रानुसार, पुंडलिक बाबा नगर येथे राहणारी विद्या उर्फ सोनु शंकर गवई (23 वर्ष) परिचारिकेचे काम करते काल रात्री पॅराडाइज कॉलनी येथे डॉ. इनामदार यांच्या दवाखान्यातून दुचाकीने घरी जात असताना तिच्या गळ्याला चायना मांजा अडकला. त्यामुळे विद्याचा गळा चिरला गेला. मांजाने गळा चिरल्याने विद्या दुचाकीवरून खाली पडली.

या परिसरातील नागरिकांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, चायना मांज्यामुळे गळ्याला रक्ताची धार लागली होती. नागरिकांनी लगेच तिला रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मृतक विद्याचे वडील नवीन कॉटन मार्केट येथे सुरक्षारक्षकाचे काम करतात. अश्या परिस्थितीत त्यांनी सोनूला परिचारिकेचे शिक्षण दिले. ती गेल्या काही महिन्यांपासून डॉ. इनामदार यांच्याकडे परिचारिकेचे काम करीत होते. काल सोनू घरी जात असतानाच ही घटना घडली व तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी भादंवि 306 प्रमाणे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: