करोना वेरिएंटने ‘या’ देशाची चिंता वाढवली; पुन्हा लसीकरणाची तयारी!


मॉस्को: करोनाच्या संसर्गामुळे जगभरात थैमान घातले आहे. करोना विषाणूच्या बदलत जाणाऱ्या वेरिएंटमुळे संसर्ग अधिक फैलावत आहे. युरोपीयन देशांमध्य डेल्टा आणि डेल्टा प्लस वेरिएंटच्या बाधितांमध्ये वाढ होत आहे. तर, दुसरीकडे रशियातही करोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. रशियाच्या काही भागांमध्ये परिस्थिती गंभीर असल्याचे सरकारने म्हटले आहे. रशियात पुन्हा लसीकरण करण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सांगितले की, देशात करोना परिस्थिती गंभीर आहे. दुर्देवाने करोनाबाधितांची प्रकरणे कमी होत नाही. देशातील अनेक भागांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी पूर्वीपेक्षा सध्याची स्थिती गंभीर असल्याची माहिती पुतीन यांनी दिली.

वाचा: करोना लस डेल्टा वेरिएंटवर किती परिणामकारक?; WHO चे तज्ज्ञ म्हणतात…

वाचा: ब्राझीलमध्ये करोना मृतांची संख्या पाच लाखांवर; विरोधकांचे आंदोलन

रशियामध्ये सोमवारी १७ हजार ३७८ बाधितांची नोंद करण्यात आली. तर, ४४० जणांचा मृत्यू झाला. करोना संसर्गाचा धोका सातत्याने वाढत असल्याचे पुतीन यांनी सांगितले. रशियात लसीकरणाला वेग देण्यासाठी पावले उचलण्यात येत आहे. त्याशिवाय लसीकरण झालेल्यांचेही पुन्हा लसीकरण करण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रशियात करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येसाठी डेल्टा वेरिएंट कारणीभूत असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

वाचा: करोना लसीकरणात चीन सुस्साट; १०० कोटींहून अधिक डोस दिले

वाचा:करोना लस घ्या, नाहीतर तुरुंगवासाची शिक्षा; ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींची धमकी

ब्लूमबर्ग वॅक्सीनेशन ट्रॅकरनुसार, सध्या जगातील काही देशांना लस पुरवठा करणाऱ्या रशियात आतापर्यंत तीन कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. एकूण लोकसंख्येत हे प्रमाण ११.२ टक्के आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण १०.२ टक्के इतके आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram