WTC FINAL : रोहित शर्माने पकडला उडी मारत कसा पकडला भन्नाट कॅच, व्हिडीओ झाला व्हायरल…


साऊदम्पटन : रोहित शर्माने फायनलच्या पाचव्या दिवशी एक भन्नाट झेल घेतल्याचे पाहायला मिळाले. या कॅचचा व्हिडीओ सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.

पाचव्या दिवशी भारतीय संघ विकेट मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होता. यावेळी भारताचा उपकर्णधार रोहित संघाच्या मदतीला धावून आला. मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हे दोघेही चांगली गोलंदाजी करत होते. इशांत यावेळी चांगला मारा करत असल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी इशांतचा एक चेंडू न्यूझीलंडचा हेन्री निकोल्सच्या बॅटच्या जवळ आला. त्यावेळी निकोल्सने बॅच पुढे केली आणि हा चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागला. त्यानंतर हा चेंडू स्लीपच्या दिशेने गेला. हा चेंडू आता पहिल्या आणि दुसऱ्या स्लीपमध्ये पडणार, असे वाटत होते. त्यामुळे आता नेमकं काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्यावेळी रोहित शर्माने दुसऱ्या स्लीपमधून पहिल्या स्लीपच्या दिशेने उडी मारली आणि झेल पकडला. रोहितने जेवहा झेल पकडला तेव्हा नेमकं काय झालं, हे कोणालाही समजले नाही. पण रोहितने यावेळी उत्तमपद्धतीने हा झेल पकडला आणि सेलिब्रेशन करत जेव्हा चेंडू हवेत उडवला तेव्हा सर्वांना समजले की, रोहितने यावेळी झेल पकडलेला आहे.
मोहम्मद शमीने केली दमदार गोलंदाजी….
आज पाचव्या दिवशी भारताच्या जलद गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या या दोन्ही अनुभवी फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले. धावा न मिळाल्यामुळे फलंदाज दबावात आले आणि त्यातच मोहम्मद शमीने संधी साधली. न्यूझीलंडच्या डावातील ६३व्या षटकात मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर अनुभवी रॉस टेलरला बाद केले. शुभमन गिलने कव्हर्समध्ये शानदार असा कॅच घेतला. गिलने उजव्या बाजूला हवेत उडी मारून कॅच घेतला. विकेट घेण्याआधी ड्रिंक ब्रेकमध्ये कर्णधार विराट कोहली शमीला काही गोष्टी समजवून सांगत होता. त्यानंतर पहिल्याच चेंडूवर शमीने रॉस टेलरला बाद केले. त्याने ३७ चेंडूत ११ धावा केल्या. शमीने आजच्या पहिल्या सत्रात दोन विकेट्स मिळल्या.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: