Video – ओबीसी आरक्षणासाठी चंद्रपुरात आंदोलन


महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे करण्यात आलेल्या या आंदोलनात
ओबीसी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचे कार्यकर्ते यावेळी प्रामुख्यानं हजर होते. ओबीसी प्रवर्गातील जातींची गणना झाली पाहिजे, पदोन्नतीत आरक्षण मिळावे, ओबीसी आरक्षण कायम ठेवावे अशा मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून पुढे ठेवण्यात आल्या. मागण्यांचे फलक हातात घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: