दोन दिवसात काय होऊ शकते WTC Final मध्ये; या ३ शक्यता आहेत


साउदम्प्टन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड एकमेकांविरुद्ध लढत आहेत. चार दिवसांचा खेळ झाला असून त्यामध्ये दोन दिवस पावसामुळे वाया गेलेत. तर ज्या दोन दिवसात खेळ झाला त्यामुळे देखील पूर्ण षटकांचा खेळ झाला नाही. अशात आयसीसीने राखीव ठेवलेला सहाव्या दिवशी देखील सामना खेळवला जाईल. सध्या साउदम्प्टनमध्ये आज आणि उद्या पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशात या कसोटी सामन्यात तीन शक्यता आहेत.

वाचा- WTC विजेतेपद कोणाला? सुनील गावस्कर म्हणाले, ICCने मार्ग काढावा

आज (मंगळवार) पाचव्या दिवशी न्यूझीलंड २ बाद १०१ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात करेल. भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या असून न्यूझीलंडचा संघ अध्याप ११६ धावांनी पिछाडीवर आहे. पुढील दोन दिवसात साधारण १९६ षटकांचा खेळ होऊ शकतो. अशात तीन शक्यता होऊ शकतात. जाणून घेऊयात कोणत्या…

वाचा- फलंदाजाने षटकार मारला आणि डोक्याला हात लावला, पाहा काय झाले Video

१) पहिली शक्यात- सामना ड्रॉ होऊ शकतो, यामध्ये न्यूझीलंड आज दिवसभरात फलंदाजी करले आणि भारताच्या धावसंख्येच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. उद्या पहिले सत्र झाल्यानंतर ते डाव जाहीर करतील. त्यानंतर भारताकडे दोन सत्र असतील ज्यात ते कसोटी वाचवतील.

वाचा- प्रत्येक कसोटीत ५ विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला झाले तरी काय? ठरतोय संघाच्या अपयशाचे कारण

२) दुसरी शक्यता- यामध्ये न्यूझीलंड वेगाने धावा करून भारतावर १७० किंवा २०० धावांची आघाडी घेऊन डाव जाहीर करतील. त्यानंतर ते भारताला फलंदाजी देतील तसेच उद्या दिवसभरात ऑल आउट करून एका डावाने सामना जिंकतील.

वाचा- फक्त मैदानावरील कामगिरीने नव्हे तर सौंदर्याने घायाळ करणारी भारताची क्रिकेटपटू

३) तिसरी शक्यता- यामध्ये भारताची गोलंदाज अतिशय शानदार कामगिरी करतील आणि आज टी टाइमच्या आधी न्यूझीलंडचा ऑल आउट करतील. त्यानंतर आजच्या शेवटच्या सत्रात आणि उद्या लंचपर्यंत फलंदाजी करून न्यूझीलंड समोर एक आव्हानात्मक धावसंख्या देतील. त्यानंतर उर्वरीत दोन सत्रात न्यूझीलंडला ५० षटकात बाद करून भारत कसोटीत विजय मिळवेल.

वाचा- विकेट मिळवण्यासाठी सुरु आहे संघर्ष; भारतीय संघाने केली मोठी चूकSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: