लग्नात जेवायला दिले नाही; फोटोग्राफरने नवरदेवासमोर डिलीट केले सगळे फोटो


वॉशिंग्टन: विवाह सोहळ्यात फोटो काढण्यासाठी गेलेल्या एका फोटोग्राफरने चक्क नवरदेवासमोरच सर्व फोटो डिलीट केले. या फोटोग्राफरने असे कृत्य करण्यामागे असलेले कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. या फोटोग्राफरला लग्नसोहळ्यात जेवण्यापासून रोखण्यात आले होते. त्या संतापातून त्याने ही कृती केली. या फोटोग्राफरने सोशल मीडियावर ही घटना सांगत आता नागरिकांनाच त्यांचे याबाबत मत विचारले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर या फोटोग्राफरने म्हटले की, फोटोग्राफी हा छंद आहे. मी श्वानाला घेऊन फिरण्यास जातो, त्याचे फोटोही काढतो. एक मित्राने मात्र , पैसे वाचवण्यासाठी त्याच्या लग्नात मला फोटोग्राफी करण्यास सांगितले. सुरुवातीला या फोटोग्राफरने मित्राला नकार दिला. मात्र, मित्राने त्याच्याकडे आग्रह धरला. फोटो व्यवस्थित नाही आले तरी चालतील, असेही या मित्राने म्हटले. अखेर २५० डॉलरच्या मेहनतान्यावर फोटोग्राफर तयार झाला.

तुरुंगात कैद्यांमध्ये टोळी युद्ध; १०० ठार, अनेक जखमी

लग्न सोहळ्यासाठीची फोटोग्राफी सकाळी ११ वाजता सुरू झाली आणि संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत सुरू होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जेवण देण्यात आले. त्यावेळी फोटोग्राफरसाठी टेबलवर जागा ठेवण्यात आली नव्हती. इतकंच नव्हे तर त्याला जेवणापासून रोखण्यात आले आणि फोटो काढण्यास सांगण्यात आले. लग्न सोहळा असलेल्या ठिकाणी असलेले उष्ण वातावरण आणि कामामुळे आपण प्रचंड थकलो होतो असे फोटोग्राफरने म्हटले. लग्न सोहळ्याच्या ठिकाणी ना एसी होती, ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती असेही या फोटोग्राफरने म्हटले.

हे कसं शक्य आहे? इंग्लंडमध्ये सांगलीच्या बाळू लोखंडेची लोखंडी खुर्ची!
कामामुळे आणि उष्ण वातावरणामुळे थकलेल्या या फोटोग्राफरने मित्र असलेल्या नवरदेवाला जेवणासाठी २० मिनिटे विश्रांती मागितली. त्यावेळी नवरदेवाने त्याला फोटो काढत राहण्यास सांगितले. फोटो न काढल्यास पैसे मिळणार नसल्याचे त्याने म्हटले. नवरदेवाच्या या उर्मट उत्तरानंतर फोटोग्राफरच्या संतापाचा पारा चढला. त्यानंतर त्याने सर्व फोटो डिलीट केले आणि तेथून निघून गेला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: