पाहा व्हिडिओ: इस्रायलची कमाल; लेझर गनने हवेतच पाडले ड्रोन विमान!


अत्याधुनिक शस्त्रांसासाठी चर्चेत असणाऱ्या इस्रायलच्या लष्कराने संरक्षण क्षेत्रात आणखी एक दखल घेण्याजोगी कामगिरी केली आहे. इस्रायलने एअरबॉर्न लेझर गनच्या मदतीने ड्रोन विमान पाडण्यात यश मिळवले. इस्रायलच्या लष्कराने नुकतीच याची चाचणी घेतली. हे यश मैलाचा दगड असल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले. हवेतून मारा करणारे ड्रोन, मोर्टार, रॉकेट, क्षेपणास्त्रांचा वेध घेण्यास सक्षम आहे. भविष्यातील युद्धांमध्ये ड्रोन विमानांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर ही चाचणी महत्त्वाची समजली जात आहे. मागील वर्षी झालेल्या आर्मेनिया-अजरबैझान युद्धात इस्रायली आणि तुर्की ड्रोन विमानांनी जोरदार हल्ले करत आर्मेनिया सैन्याचे कंबरडे मोडले होते. या ड्रोन हल्ल्याविरोधात आर्मेनियाच्या तोफा आणि रणगाडे निष्प्रभ ठरले होते.

छोट्या विमानात ठेवली लेझर गन

इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास विभागाचे प्रमुख यानिव रोटेम यांनी सांगितले की, या चाचणी दरम्यान एका लहानश्या प्रवासी विमानावर हाय पॉवर लेझर सिस्टीम ठेवण्यात आली आहे. या लेझर यंत्रणनेने यशस्वीपणे हवेत काही ड्रोन विमानाना पाडले. ड्रोन, मोर्टार, रॉकेट, क्षेपणास्त्रांचा वेध घेणारी ही यंत्रणा येत्या तीन ते चार वर्षात पूर्णपणे तयार होईल, असे त्यांनी सांगितले. इस्रायलकडे आयर्न डोम सारखी क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा आहे. मात्र, ही ती महागडी आहे. इस्रायलने जारी केलेल्या व्हिडिओनुसार एका लहान विमानावर लेझर सिस्टिम लावण्यात आली.

किती अंतरावरील लक्ष्य साधणार?

चाचणी दरम्यान इस्रायलच्या लेझर शस्त्राने तीन फूट अंतरावरून विमान पाडले. मात्र, ही यंत्रणा पूर्ण विकसित झाल्यानंतर २० किमी अंतरावरून ड्रोन विमानाचे लक्ष्य भेद करता येऊ शकतो असे संशोधकांनी म्हटले. इस्रायलच्या संरक्षण खात्यासोबत लेझर सिस्टिमवर काम करणारी कंपनी इल्बिट सिस्टमचे प्रमुख ओरेन सबाग यांनी सांगितले की, ही चाचणी यशस्वी होणे हे खूप महत्त्वपूर्ण आहे.

पाहा: बापरे! अमेरिकन नौदलाकडून समुद्रात १८ हजार किलो बॉम्बचा स्फोट

हवाई लेझर शस्त्र उत्तम

तज्ज्ञांच्या मते हवाई लेझर गन ही जमिनीवरून मारा करणाऱ्या लेझर गनपेक्षा उत्तम आहे. हवाई लेझर गम अधिक उंचावरही घेता जाऊन येऊ शकते. ढगांमुळे काही वेळेस जमिनीवरील लेझर गन फारशी प्रभावी कामगिरी करू शकत नाही. नुकत्याच झालेल्या चाचणीत ३००० फूटांवर उडणाऱ्या ड्रोन विमान पाडण्यात आले. इस्रायलने ही यंत्रणा विकसित केल्यास त्यांना एअर डिफेन्ससाठी स्वस्तातील पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

Video: इस्रायलने लेझर गनने पाडले ड्रोन विमानSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: