Asif Ali Six : फलंदाजाने षटकार मारला आणि डोक्याला हात लावला, पाहा काय झाले Video


लंडन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पावसाने घातलेल्या गोंधळामुळे क्रिकेट चाहत्यांची मोठी निराशा झाली. या सामन्यात चांगली चुरस पाहायला मिळेल असे वाटत होते. पावसामुळे सर्वांचा मूड ऑफ झाला. अशात इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या क्लब क्रिकेटमध्ये एक घटना चर्चेत आली आहे.

वाचा- WTC Final: जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू ज्याने ICCच्या सर्व फायनल मॅच खेळल्या

इंग्लंडमधील साउदम्प्टन येथे पाऊस पडत असला तरी अन्य ठिकाण वातावरण चांगले आहे आणि तेथे क्रिकेट सामने सुरू आहे. अशाच एका सामन्यातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा- फक्त मैदानावरील कामगिरीने नव्हे तर सौंदर्याने घायाळ करणारी भारताची क्रिकेटपटू

क्रिकेटमध्ये षटकार मारल्यावर कोणत्याही फलंदाजाला आनंद होतो. पण एखाद्या क्रिकेटपटूने षटकार मारल्यावर दुख: झाल्याचे तुम्ही कधी पाहिले नसले. प्रत्येक फलंदाजाची इच्छा असते की त्याने मारलेला षटकार मैदानाबाहेर जावा. इंग्लंडचा क्रिकेटपटू असिफ अलीची देखील हीच इच्छा होती आणि ती पूर्ण देखील झाली. पण हा षटकार मारल्यानंतर मात्र त्याने डोक्याला हात लावला.

वाचा- प्रत्येक कसोटीत ५ विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला झाले तरी काय? ठरतोय संघाच्या

वेस्ट यॉकशायर येथे रविवारी झालेल्या सामन्यात इलिंगवर्थ सेंट मेरी क्लबकडून खेळणाऱ्या अलीने शानदार असा षटकार मारला. अलीने फाइन लेगच्या दिशेने षटकार मारला. पण काही क्षणातच त्याने डोक्याला हात लावला. कारण अलीने मारलेला षटकार मैदानाबाहेर गेला आणि त्याच्या गाडीवर पडला ज्यामुळे काच फुटली. अलीच्या या षटकारानंतर विरोधी संघातील खेळाडू आणि मैदानावरील अंपायर यांना मात्र हसू आवरता आले नाही.

जेव्हा बॉल माझ्या गाडीच्या दिशेने जात होता तेव्हा मला लक्षात आले की काय होणार आहे, असे अलीने आयटीव्ही न्यूजशी बोलताना सांगितले. मी या क्लबकडून खुप वर्षापासून खेळत आहे. पण कधीच गाडी कार पार्किंगच्या येथे लावत नाही. मी ती नेहमी बाहेरच्या बाजूला लावतो.

वाचा- WTC विजेतेपद कोणाला? सुनील गावस्कर म्हणाले, ICCने मार्ग काढावा

कल्बचे चेअरमन जेरमी रोड्स यांनी अलीच्या गाडीचे झालेले नुकसान भरून देणार असल्याचे सांगितले. हा फक्त योगा योग होता. अलीने आमच्यासाठी खुप धावा काढल्या आहेत आणि त्यासाठी त्याने मेहनत घेतली आहे. दरम्यान सामना झाल्यानंतर अलीला घरी जाण्यासाठी टॅक्सी बोलवावी लागली.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: