Iran Us बायडन यांना भेटणार नाही; इराणच्या नव्या राष्ट्रपतींची भूमिका


हायलाइट्स:

  • इराण-अमेरिकेतील तणाव कायम राहण्याची शक्यता
  • अमेरिकेबाबत मवाळ धोरण घेणार नसल्याचे इराणच्या नियोजित राष्ट्रपतींचे संकेत
  • इराणचे नियोजित अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यावर अमेरिकेचे निर्बंध

तेहरान : ‘अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना भेटणार नाही; तसेच इराणच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबतही कुठलीही तडजोड करणार नाही,’ असे प्रतिपादन इराणचे नियोजित अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी सोमवारी केले. अमेरिकेबाबत मवाळ धोरण नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. अमेरिकेने त्यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मागील आठवड्यामध्ये झालेल्या निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून आलेल्या रईसी यांनी सोमवारी पहिली पत्रकार परिषद घेतली. रईसी म्हणाले, ‘अमेरिकेला इराणला जाचक ठरणारी बंधने उठवावी लागतील,’ असे ते म्हणाले. ‘शेजारी देशांशी संबंध चांगले ठेवण्यास इराणचे प्राधान्य असेल,’ असे स्पष्ट करतानाच येमेनमध्ये सौदी अरेबियाने तातडीने हस्तक्षेप करणे थांबवावे, असे आवाहनही त्यांनी केले. ‘इराणला जगाशी संवाद साधायचा आहे. माझ्या सरकारचे प्राधान्य शेजारी आणि प्रादेशिक भागांतील देशांशी संबंध वाढविण्यास राहील,’ असे ते म्हणाले.

वाचा: इराणचा एकमेव अणू ऊर्जा प्रकल्प अचानक बंद; मोसादची पुन्हा कारवाई?

वाचा:… तर, पाकिस्तानला अण्वस्त्रांची गरजच नाही: इम्रान खान

अमेरिका इराणबरोबरील अणुकरारामध्ये पुन्हा येण्याची शक्यता असताना रईसी यांनी आंतरखंडीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत कुठलीही तडजोड करणार नसल्याचे विधान केले. ते म्हणाले, ‘आंतरखंडीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत आणि प्रादेशिक सेनेला पाठिंब्याबाबत कुठलीही तडजोड होणार नाही. बायडेन यांचीही भेट घेणार नाही.’ अमेरिकेने रईसी यांच्या वक्तव्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पाहा: बापरे! अमेरिकन नौदलाकडून समुद्रात १८ हजार किलो बॉम्बचा स्फोट

‘मानवी हक्कांचा मी समर्थक’

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या निकटचे असणाऱ्या रईसी यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. रईसी यांच्या १९८८मधील सामूहिक हत्याकांड प्रकरणातील समावेशामुळे त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. मानवी हक्कांचे आपण समर्थक असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: