तर, पाकिस्तानला अण्वस्त्रांची गरजच नाही: इम्रान खान


हायलाइट्स:

  • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अण्वस्त्रांबाबत मोठे वक्तव्य
  • पाकिस्तानला भविष्यात अण्वस्त्रांची आवश्यकता भासणार नाही
  • मात्र, त्यासाठी काश्मीर मुद्याबाबत तोडगा निघणे आवश्यक

इस्लामाबाद: अण्वस्त्रांचा उल्लेख करून भारताला युद्धाची धमकी देण्याचा प्रयत्न करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अण्वस्त्रांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. काश्मीर मुद्याबाबत तोडगा निघाल्यास अण्वस्त्रांची आवश्यकता भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

एका परदेशी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. इम्रान खान यांनी म्हटले की, काश्मीरबाबत तोडगा निघाल्यास दोन्ही देश चांगल्या शेजारी देशांसारखे राहतील. तेव्हा आम्हाला अण्वस्त्रांची आवश्यकता भासणार नाही. काश्मीरच्या मुद्याबाबत मध्यस्थी करणे आणि जनमत संग्रह करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडे करणार असल्याचे खान यांनी सांगितले. अमेरिकेने इच्छाशक्ती दाखवल्यास या समस्येचे निराकरण होईल असेही त्यांनी म्हटले.

वाचा:राम जन्मभूमीनंतर नेपाळचा आता योगावर दावा; ओली यांच्या वक्तव्याने नवा वाद?

पाकिस्तानकडे असलेले अण्वस्त्रे ही आमच्या सुरक्षेसाठी असल्याचे खान यांनी म्हटले. तुमचा शेजारचा देश सातपटीने मोठा असल्यावर तुम्ही चिंतेत असणे स्वाभाविक आहे. मी अण्वस्त्रांविरोधात आहे. पाकिस्तान आणि भारतादरम्यान तीन वेळेस युद्ध झाली आहेत. त्यानंतर आमच्याकडे अण्वस्त्रे आहेत आणि तेव्हापासून एकही युद्ध झाले नसल्याचे खान यांनी मुलाखतीत सांगितले.

वाचा: पाकिस्तानकडून अमेरिकेची कोंडी? इम्रान खान यांचा सीआयएच्या ‘या’ मागणीला विरोध

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी म्हटले की, अमेरिका हा जगातील शक्तीशाली देश असून त्यांची मोठी जबाबदारी आहे. आमच्या उपखंडात १.४ अब्ज नागरीक आहेत. आम्ही फक्त काश्मीरच्या मुद्यावरून ओलीस आहोत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनुसार, काश्मीर हा वादग्रस्त मुद्दा असल्याचेही खान यांनी म्हटले. काश्मीरमध्ये जनमत संग्रह झाला पाहिजे. जेणेकरून येथील नागरीक आपल्या भवितव्याचा निर्णय घेऊ शकतील.

वाचा: इराणचा एकमेव अणू ऊर्जा प्रकल्प अचानक बंद; मोसादची पुन्हा कारवाई?

पाहा: बापरे! अमेरिकन नौदलाकडून समुद्रात १८ हजार किलो बॉम्बचा स्फोट

याआधीदेखील इम्रान खान यांनी काश्मीर मुद्यावर अमेरिकेने मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्सुकताही दाखवली होती. मात्र, भारताने याला विरोध केल्यानंतर ही चर्चा थांबली. जम्मू-काश्मीरचा मुद्या हा दोन देशांमधील प्रश्न असून दोन्ही देशांच्या पुढाकाराने यावर तोडगा काढला जाऊ शकतो अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली होती.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: