Pfizer: कोव्हिड-१९ विरोधी तोंडावाटे घेता येणाऱ्या औषधाची चाचणी सुरू


हायलाइट्स:

  • तोंडाद्वारे घेता येणार कोव्हिड-१९ विरोधी औषध?
  • फायझर – बायोएनटेकचे प्रयत्न सुरू
  • लवकरच सुरू होणार पीएफ-०७३२१३३२ या औषधाची मानवी चाचणी

नवी दिल्ली : जर्मनीच्या ‘बायोएनटेक’ कंपनीसोबत मिळून कोव्हिड १९ विरोधी एमआरएनए लस विकसीत केल्यानंतर ‘फायझर‘कडून आता तोंडावाटे घेता येणाऱ्या औषधाचं परीक्षण सुरू करण्यात आलंय.

‘फायझर’नं दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिड १९ चा फैलाव रोखण्यासाठी तोंडावाटे घेता येईल अशा अँटी व्हायरल औषधाची लवकरच मानवी चाचणी घेण्यात येणार आहे.

संभाव्य स्वरुपात लक्षणांच्या आधारावर संक्रमणाच्या सुरुवातीलाच रुग्णालयात दाखल न करता रुग्णांवर उपचार सुरू करण्यासाठी तोंडाद्वारे घेतलं जाणारं औषध गोळ्यांच्या स्वरुपात विकसीत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं ‘फायझर’नं म्हटलंय.

Murder Mystery: आंतरराष्ट्रीय बायकरचा मृत्यू : सामान्य मृत्यू नाही तर हत्या, तीन वर्षानंतर खुलासा
Shahid Amrish Tyagi: जन्मानंतर १६ वर्षांनी पहिल्यांदाच मुलीनं पाहिला शहीद पित्याचा मृतदेह
दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मानवी चाचणीत १८ वर्षांहून अधिक वयाच्या २६६० निरोगी व्यक्तींना सहभागी करून घेतलं जाईल. ‘फायझर’कडून तोंडावाटे घेता येणाऱ्या पीएफ-०७३२१३३२ या औषधाची चाचणी अशा घरांत केली जाईल जिथे एखाद्या व्यक्तीमध्ये कोविड १९ च्या लक्षणांची पुष्टी करण्यात आली असेल.

या औषधाच्या मानवी चाचणीत ‘रिटोनॅविर’चा डोसही दिला जाणार आहे. ‘रिटोनॅविर’ हे एचआयव्ही संक्रमणाच्या उपचारांत वापरलं जाणारं सामान्य औषध आहे.

उल्लेखनीय म्हणजे, Merck आणि Ridgeback Biotherapeutics या कंपन्यांनीही एकत्र येत आपल्या ‘मोलनुपीरवीर’ या औषधाची चाचणी सुरू केलीय. हे औषध कोव्हिड १९ चा फैलाव रोखण्यासाठी वापरता येऊ शकतं का? हे मानवी परीक्षणानंतर सिद्ध होऊ शकेल. रुग्णालयांत दाखल नसलेल्या रुग्णांवर या औषधाची चाचणी केली जातेय. या औषधामुळे रुग्णालयात दाखळ होण्याचा किंवा मृत्यूचा धोका कमी करता येऊ शकतो का? याचादेखील अभ्यास सुरू आहे.

कारगिलमध्येही अत्याधुनिक क्रीडा प्रशिक्षण केंद्र, केंद्रीय मंत्र्यांची घोषणा
punjab congress : पंजाबमधील चन्नी सरकार धोक्यात? काँग्रेस आमदारांनीच केली विश्वासदर्शक ठरावाची मागणीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: