WTC विजेतेपद कोणाला? सुनील गावस्कर म्हणाले, ICCने मार्ग काढावा


साउदम्प्टन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साउदम्प्टन येथे लढत सुरू आहे. राखीव दिवसासह आता दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. अशात फायनल सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. ही लढत ड्रॉ झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद मिळणार आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आयसीसीला एक उपाय सुचवला आहे.

वाचा- फक्त मैदानावरील कामगिरीने नव्हे तर सौंदर्याने घायाळ करणारी भारताची क्रिकेटपटू

सामन्याचा पहिला आणि चौथा दिवस वाया गेला आहे. आतापर्यंत फक्त १४१.१ षटकाचा खेळ झाला असून अद्याप तीन डाव शिल्लक आहेत. पुढील दोन दिवास प्रत्येकी ९० षटकाचा खेळ झाला तरी निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. अशात सुनील गावस्करांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सामना ड्रॉ झाल्यास त्याचे विजेतेपद ठरवण्यासाठी मार्ग शोधला पाहिजे असे म्हटले आहे.

वाचा- प्रत्येक कसोटीत ५ विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला झाले तरी काय? ठरतोय संघाच्या अपयशाचे कारण

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता ठरवण्यासाठी मार्ग काढला पाहिजे. फायनल मॅच ड्रॉ झाली तर विजेता कोण असेल हे निश्चित केले पाहिजे. आयसीसीच्या क्रिकेट समितीने त्याचा विचार केला पाहिजे असे गावस्करांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.

WTC फायनल ड्रॉ होण्याची चिन्हे आहेत आणि विजेतेपद दोन्ही संघांना मिळेल. विजेतेपद दोघांना मिळण्याची ही पहिलीच वेळ असेल. फुटबॉलमध्ये विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूट केले जाते. टेनिसमध्ये पाच सेट होतात आणि एक ट्राय ब्रेकर होतो, असे ते म्हणाले.

वाचा- क्रिकेटपटू भडकला; WTC फायनलवरून ICC ला सुनावले, यापुढे…

२०१९च्या वनडे वर्ल्डकपमध्ये जेव्हा अंतिम लढत टाय झाली तेव्हा सर्वाधिक चौकार कोणी मारले यावर विजेतेपद ठरवण्यात आले होते. टेस्ट चॅम्पियनशिपच्या बाबत देखील असे काही तरी ठरवण्याची गरज आहे.

वाचा- WTC Final: जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू ज्याने ICCच्या सर्व फायनल मॅच खेळल्या

फायनल सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या असून न्यूझीलंडने २ बाद १०१ धावा केल्या आहेत.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: