सेन्सेक्स -निफ्टीत मोठी पडझड ; सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांना बसला शॉक


हायलाइट्स:

  • भांडवली बाजारात आज पुन्हा एकदा चौफेर विक्रीचा मारा सुरु आहे.
  • आज बुधवारी सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला आहे.
  • निफ्टीत १०० अंकांची घसरण झाली आहे.

मुंबई : भांडवली बाजारात आज पुन्हा एकदा चौफेर विक्रीचा मारा सुरु आहे. आज बुधवारी सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला असून निफ्टीत देखील १०० अंकांची घसरण झाली आहे. आजच्या पडझडीत गुंतवणूकदारांना एक लाख कोटींचा शॉक बसला आहे.

ऑक्टोबरपासून ATM सेवा बंद; या बँंकेने घेतला निर्णय, हे आहे त्यामागचे कारण
एनर्जी आणि फार्मा हे दोन क्षेत्र वगळता भांडवली बाजारात सर्वच क्षेत्रात नफेखोरांनी विक्रीचा मारा सुरु केला आहे. सेन्सेक्समधील ३० पैकी २१ शेअर घसरले आहेत. यात आयटीसी, टीसीएस, टाटा स्टील, एल अँड टी, भारती एअरटेल, इन्फोसिस, रिलायन्स, एचयूएल, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

कच्च्या तेलाने गाठला तीन वर्षांचा उच्चांक; पेट्रोल- डिझेलबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
एकीकडे बाजारात पडझड होत असताना सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडिया आणि एनटीपीसी या शेअरमध्ये मात्र वाढ झाली आहे. आज कोल इंडियाचा शेअर ८.१६ टक्क्यांनी वधारला आहे.देशात कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने कोल इंडियाच्या शेअरची मागणी वाढली आहे. एनटीपीसीचा शेअर ५ टक्क्यांनी वाढला आहे. तीन दिवसात एनटीपीसीचा शेअर १३ टक्क्यांनी वधारला आहे.

डिजिटल करन्सीच्या किमती घसरल्या ; तब्बल दीड लाख रुपयांनी स्वस्त झाला बिटकॉइन
सध्या सेन्सेक्स ३९१ अंकांनी कोसळला असून तो ५९२७६ अंकावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८३ अंकाने घसरला असून तो १७६६४ अंकावर आहे. चलन बाजारात काल डाॅलरच्या तुलनेत रुपयात २३ पैशांचे अवमूल्यन झाले. तो ७४.०६ रुपयांपर्यंत खाली आला. काल भांडवली बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १९५८ कोटी काढून घेतले.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता; जाणून घ्या ‘नाॅमिनेशन’चे महत्व आणि उपयुक्तता
काल मंगळवारी इंट्रा डेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५० अंकांनी आपटला होता. या पडझडीने गुंतवणूकदारांना जवळपास दोन लाख कोटींचा फटका बसला. बाजारात सकाळपासून नफावसुलीचा दबाव होता. दुपारी चौफेर विक्रीची तीव्रता वाढली. आयटी कंपन्या, ऑटो तसेच स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणूकदारांनी नफावसुलीचा सपाटा लावला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: