देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या Honda Activa 125 स्कूटरवर मिळतेय भरघोस सूट, असा घ्या लाभ


तुम्ही जर नवीन दुचाकी घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण कोरोना काळात वाहनविक्रीमध्ये झालेली घट भरून काढण्यासाठी विविध कंपन्या अनेक जबरदस्त ऑफर घेऊन आल्या आहेत. होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया देखील आपल्या सर्वात लोकप्रिय Honda Activa 125 या स्कूटरवर भरघोस सूट देत आहे.

देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरमध्ये Honda Activa 125 चा समावेश आहे. यावर कंपनी 3 हजार 500 रुपयांची कॅशबॅक ऑफर देत आहे. मात्र याचा लाभ उठवण्यासाठी तुमच्याकडे एसबीआयचे क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केली तरच हा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. ग्राहकांना एसबीआयच्या क्रेडीट कार्डद्वारे कमीत कमी 40 हजारांचा व्यवहार करणेही गरजेचे असल्याचे कंपनीने आपल्या ऑफरमध्ये म्हटले आहे.

फिचर्स –

– Honda Activa 125 मध्ये होंडा लिव्हो बीएस6 आणि 125 सीसीचे इंजिन असून यात 4 स्ट्रोक, फॅन कुल्ड आणि एसआयही फिचर्सही देण्यात आली आहेत.

-मतसेय या स्कूटरची लांबी 1850 मिलीमीटर, रुंदी 707 मिलिमीटर आणि उंची 1170 मिलीमीटर आहे. ग्राउंड क्लिअरन्स 169 मिलीमीटर असून सीटची उंची 712 मिलीमीटर आहे.

– Honda Activa 125 मध्ये 5.3 लीटर क्षमतेची पेट्रोल टाकी देण्यात आली असून याचा अॅव्हरेज 50 ते 55 किलोमीटर आहे.

– Honda Activa 125 मध्ये पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स सस्पेंशन आणि रिअरमध्ये एडजस्टेबल स्प्रिंग लोडेड हाईड्रॉलिक सस्पेंशन देण्यात आले आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: