राम जन्मभूमीनंतर नेपाळचा आता योगावर दावा; ओली यांच्या वक्तव्याने नवा वाद?


काठमांडू: नेपाळचे हंगामी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले आहे. नेपाळनेच जगाला योग दिला असल्याचे त्यांनी म्हटले. योगाचा जन्मच नेपाळमध्ये झाला. योग प्रकार सुरू झाला तेव्हा भारत त्यावेळी नव्हताच असेही त्यांनी म्हटले. आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. मागील वर्षी त्यांनी प्रभू राम यांचा जन्म नेपाळमध्ये झाला असल्याचे त्यांनी म्हटले होते.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नेपाळचे हंगामी पंतप्रधान ओली यांनी म्हटले की, योगासने सुरू झाले तेव्हा भारताचा जन्मच झाला नव्हता. त्यावेळी भारत हा लहान गट, संस्थांनांमध्ये विभागला गेला होता. भारत हा त्यावेळी एखादा खंड, उपखंडासारखा होता. भारतातील तज्ज्ञ याबाबतचे तथ्य लपवत असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा:लशीचा डेल्टा वेरिएंटवर किती परिणाम? WHO ने दिली महत्त्वाची माहिती

वाचा:करोना लसीकरणात चीन सुस्साट; १०० कोटींहून अधिक डोस दिले

नेपाळच्या पंतप्रधानांनी याआधीदेखील अशाच प्रकारची वक्तव्ये केली आहेत. मागील वर्षी त्यांनी प्रभू राम हे नेपाळी होते. त्यांचे खरे जन्मस्थान अयोध्या नेपााळमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला होता. अयोध्या हे एक गाव असून बीरगंजच्या पश्चिम भागात असल्याचे त्यांनी सांगितले. भारत हा नेपाळच्या संस्कृतीवर दावा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

वाचा: करोना लशीचे दोन भिन्न डोस प्रभावी?; WHO ने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

नेपाळचे माजी महाराज ज्ञानेंद्र यांना करोनाची लागण; कुंभमेळ्यात होते उपस्थित

Coronavirus vaccine नेपाळमध्ये करोना लस तुटवडा; भारताकडे केली लशींची मागणी

भारताने सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात बहुमताने मंजूर झाला होता. त्यानंतर २१ जूनपासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: