WTC Final IND vs NZ Southampton Weather Live Updates:किमान आज तरी मॅच होणार का? जाणून घ्या अपडेट


साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल साउदम्प्टनच्या द रोझ बाउल मैदानावर सुरू आहे. पाचव्या दिवशी न्यूझीलंडचा संघ २ बाद १०१ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात करेल. अद्याप न्यूझीलंडचा संघ ११६ धावांनी पिछाडीवर आहे.

वाचा- प्रत्येक कसोटीत ५ विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला झाले तरी काय? ठरतोय संघाच्या

महालढतीचा पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे पूर्ण वाया गेला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी देखील पूर्ण ९० षटकांचा खेळ झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी ६४.४ तर तिसऱ्या दिवशी ७६.३ षटकाचा खेळ झाला होता. आता पाचवा दिवस खास ठरू शकतो. आज किती आणि कसा खेळ होता त्यावर सामन्याचा निकाल लागणार की नाही हे ठरणार आहे.

वाचा- क्रिकेटपटू भडकला; WTC फायनलवरून ICC ला सुनावले, यापुढे…

पाचव्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली आणि उन पडले तर भारताचे पहिले टार्गेट न्यूझीलंडला आघाडी घेण्यापासून रोखण्याचे असेल. असे झाले तर भारताला अधिक धावा करून राखीव दिवशी न्यूझीलंडला मोठे लक्ष्य द्यावे लागले. दोन दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्याने राखीव दिवशी खेळ होणार हे निश्चित आहे.

वाचा- फक्त मैदानावरील कामगिरीने नव्हे तर सौंदर्याने घायाळ करणारी भारताची क्रिकेटपटू

पाचव्या दिवशी काय होणार

हवामान विभागाने दिलेल्या अपडेटनुसार पाचव्या दिवशी निराशा हाती येण्याची शक्यता आहे. मंगळवारी साउदम्प्टन येथे ६५ टक्के पावसाचा अंदाज आहे. यामुळे चाहत्यांना फार कमी तासांचा खेळ पाहायला मिळू शकतो.


वाचा- IND vs NZ WTC Final: पहिल्या डावात २५० पेक्षा कमी धावा आणि भारताचा पराभव

पिच रिपोर्ट

पाचव्या दिवशी उन पडले तर फिरकीपटूंना मदत मिळू शकते. उद्या देखील सामन्याचा निकाल लागला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाणार आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: