MI v PBKS : मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यासाठी संघात केले दोन मोठे बदल, कोणते जाणून घ्या…


आबुधाबी : मुंबई इंडियन्सने आजच्या पंजाबविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात दोन मोठे बदल केल्याचे पाहायला मिळाले आहे. मुंबई इंडियन्सने यावेळी एक महत्वाचा फलंदाज बदलला असून आता त्याचा किती फायदा संघाला होतो, ते पाहावे लागणार आहे.

मुंबई इंडियन्सने यावेळी संघातून इशान किशनला बाहेर केले आहे, इशानच्या जागी मुंबईने आपल्या संघात सौरभ तिवारीला स्थान दिले आहे. त्याचबरोबर मुंबईने आपल्या संघात नॅथन कल्टर नाइलचाही समावेश केला आहे. मुंबई इंडियन्सला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. पण आता जर मुंबई इंडियन्सचा पराभव झाला तर त्यांचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यासाठी मुंबई इंडियन्सने एक चुक टाळायला हवी, असे सनोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा आजचा सामना होणार आहे तो पंजाब किंग्सबरोबर. आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल, त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. मुंबई इंडियन्सच्या संघाचे आता १० सामने झाले आहेत. या १० सामन्यांमध्ये मुंबईला चार विजय मिळवता आले आहेत, तर सहा पराभव त्यांच्या पदरी पडले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ सध्याच्या घडीला आठ गुणांसह सातव्या स्थानावर घसरला आहे. त्यामुळे त्यांना आता विजय मिळवायचा असेल तर त्यासाठी त्यांना सातत्याने होणार एकच चुक सुधारावी लागणार आहे. मुंबई इंडियन्सची मधली फळी ही सर्वात जास्त जबाबदार आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये रोहित आणि क्विंटन डीकॉक यांनी धड्काबाज फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पण त्यानंतर दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले होते. त्याचबरोबर रोहित बाद झाल्यावर धावांचा यशस्वी पाठलाग करणेही मुंबई इंडियन्सला जमत नसल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे रोहितचे टेंशन वाढलेले असेल. कारण आपण बाद झाल्यावर संघाचे काय होणार, ही भिती त्याला सतावत असेल. त्यामुळे कोहित चांगली सुरुवात करत असला तरी त्याला अजूनही मोठी खेळी साकारता आलेली नाही.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: