विजांच्या कडकडाटासह पावसाचा धुमाकूळ; बुलडाण्यात एकाने गमावला जीव


हायलाइट्स:

  • बुलडाणा जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
  • अंगावर वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
  • दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ

बुलडाणा : राज्यातील इतर काही जिल्ह्यांप्रमाणेच बुलडाणा जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला आहे. मात्र यावेळी खामगाव तालुक्यात आदमापूर येथे ५५ वर्षीय शेतकऱ्याचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे.

निरंजन धोंडीराम सरकटे (रा. कदमापुर, ता.खामगाव जि.बुलडाणा) हे सोमवारी शेतात बकरी चारण्यासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास वीज अंगावर कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. कदमापूरमधील गट नंबर ४२० मध्ये त्यांच्याकडे एकूण १.६२ हेक्टर जमीन आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या अंतर्गत त्यांना ही जमीन मिळाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

जळगावात खळबळ! पत्नी माहेरी गेल्यानं निराश झालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दुपारी पूर नियंत्रणासाठी धरणाचे ५ दरवाजे २५ सेंटीमीटरने उघडले आहेत. त्याद्वारे पैनगंगा नदीमध्ये १२६.८ क्यूसेक एवढे पाणी सोडण्यात येत आहे.

दरम्यान, आवक वाढल्यास विसर्गात आणखी वाढ करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच पैनगंगा नदीच्या काठावरील गावांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.



Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: