जास्तीत जास्त मुलं जन्माला घाला आणि 1 लाख मिळवा, मंत्र्यांची अजब ऑफर


मिझोराम मधील क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमानिय रौते यांनी त्यांच्या मतदारसंघातील जनतेला एक अजब आवाहन केलं आहे. जास्तीत जास्त मुलं जन्माला घाला आणि 1 लाख रुपये घेऊन जा अशी ऑफर त्यांनी जनतेला केली आहे. मिझोरामची लोकसंख्या वाढविण्यासाठी रौते यांनी हा अजब प्रकार केला आहे.

ऐज्वाल पूर्व 2 या मतदारसंघातून रौते निवडून आले आहेत. ते मिझोरामचे क्रीडा, पर्यटन व मनुष्य बळ विकास मंत्री आहेत. रौते यांनी हे विधान करताना साधारणत: किती मूलं जन्माला घालावी याबाबत काहीच सांगितले नाही. मात्र जास्तीत जास्त मुलं असणाऱ्यांना त्यांनी हे इनाम जाहीर केले आहे.

मिझोरामची लोकसंख्या फारच कमी आहे, साधारणतः देशात 1 चौरस मीटर मागे 382 लोकं असा हिशोब आहे, तर मिझोराम मध्ये ही संख्या अवघी 52 आहे. त्यामुळे father’s day च्या निमित्ताने मी एक ऑफर जाहीर करतोय. जास्तीत जास्त मुलं असणाऱ्यांना आमच्याकडून 1 लाखाच बक्षीस देण्यात येईल, असे रौते यांनी जाहीर केले आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: