लशीचा डेल्टा वेरिएंटवर किती परिणाम? WHO ने दिली महत्त्वाची माहिती


वॉशिंग्टन: भारतात पहिल्यांदा आढळलेल्या करोना विषाणूच्या डेल्टा वेरिएंटमुळे काही देशांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या वेरिएंटमुळे करोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याचे समोर आल्याने अनेक देशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीमुळे चिंतेत अधिकच भर पडली आहे. डेल्टा वेरिएंटविरोधात करोना लस फारशी प्रभावी ठरत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले. करोना विषाणूमध्ये उत्परिवर्तन होत असल्यामुळे लशीचा प्रभाव कमी होत असल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले.

डेल्टा वेरिएंटमध्येही म्युटेशन झाल्याने डेल्टा प्लस हा नवा वेरिएंटसमोर आला आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. ब्रिटनसह युरोपीयन देशांमध्येही डेल्टा वेरिएंटबाधितांची संख्या वाढत आहे. डेल्टा वेरिएंटपासून बचाव करण्यासाठी ब्रिटन व इतर देशांनी वेगाने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा:करोना लसीकरणात चीन सुस्साट; १०० कोटींहून अधिक डोस दिले

वाचा: ब्राझीलमध्ये करोना मृतांची संख्या पाच लाखांवर; विरोधकांचे आंदोलन

लशीचे दोन्ही डोस आवश्यक

करोना लशीचा एकच डोस घेतलेल्यांना डेल्टा वेरिएंटची बाधा होत असल्याचे समोर आले आहे. एकच डोस घेतल्यामुळे डेल्टा वेरिएंटची बाधा होत आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडनुसार ज्यांनी फायजर लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना करोनाची बाधा न होण्याची शक्यता ८८ टक्के आहे. तर, फायजर, एस्ट्राजेनेका लशीचा एकच डोस घेतला असल्यास विषाणूपासून ३३.५ टक्के इतकाच बचाव होऊ शकतो.

वाचा: करोना लशीचे दोन भिन्न डोस प्रभावी?; WHO ने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
वाचा: चांगली बातमी ! करोनाची दुसऱ्यांदा बाधा होण्याचा धोका कमी असल्याचा दावा

रशियाचा दावा

‘स्पुटनिक व्ही’ लस डेल्टा वेरिएंटविरोधात अधिक प्रभावी असल्याचा दावा रशियाने केला आहे. इतर कोणत्याही लशीपेक्षा रशियाने विकसित केलेली स्पुटनिक व्ही लस ही डेल्टा वेरिएंटविरोधात अधिक प्रभावी असल्याचे रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडने (RDIF) म्हटले. लवकरच याबाबतचे संशोधन आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत प्रकाशित होणार आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram