IND vs NZ WTC Final: भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथ्या दिवशी काय होणार? वाचा मोठी अपडेट


साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पहिल्या तीन दिवसात पावसाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ पासवामुळे वाया गेला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसामुळे आणि खराब प्रकाशामुळे खेळ वेळेआधीच थांबवावा लागला. राखीव दिवसाचा विचार करून अद्याप तीन दिवसांचा खेळ शिल्लक आहे.

वाचा- IND vs NZ WTC Final: आणखी १५४ धावा आणि भारताचा विजय पक्का

काल रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने २ बाद १०१ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने दोन्ही सलामीवीरांना गमावले आहे. टॉम लॅथम आणि डेव्होन कॉन्वे यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागिदारी केली. लॅथम ३० धावांवर बाद झाला. तर कॉन्वे ५४ धावांवर माघारी परतला. भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या असून न्यूझीलंड ११६ धावांनी पिछाडीवर आहे.

वाचा- Video रोनाल्डोचा अफलातून गोल; फक्त १४ सेकंदात ९२ मीटर अंतर पार

कसे असेल तिसऱ्या हवामान

एक्यूवेदरने दिलेल्या माहितीनुसार २१ जून रोजी साउदम्प्टन येथे पावसाची शक्यता आहे. यामुळे चौथ्या दिवशी पहिल्या आणि तिसऱ्या सत्राचा खेळ खराब होऊ शकतो. तर दुसऱ्या सत्रात देखील ढगाळ हवामान असेल. सामना सुरू होण्याआधी सकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी ६० टक्के पावसाची शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी १० ते १२ या काळात पाऊस, त्यानंतर दुपारी एक ते तीन ढगाळ वातावरण आणि चार ते सहा यावेळेत पुन्हा पावसाची शक्यता आहे.

वाचा- ‘भारत WTC फायनलची जिंकल्यास मी पुन्हा न्यूड…

तिसरा दिवस न्यूझीलंडचा

काइल जेमिसनने घेतलेल्या पाच विकेटच्या जारोवर न्यूझीलंडने भारताला २१७ धावांवर रोखले. त्यानंतर दिवसाचा खेळ संपला तेव्हा फक्त २ विकट गमावून त्यांनी १०१ धावा केल्या होत्या. त्यामुळे तिसरा दिवस न्यूझीलंडचा ठरला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: