Explainer: कोण आहे सईद खान? खासदार भावना गवळी यांच्यावरील आरोपांशी त्याचा संबंध काय?


हायलाइट्स:

  • खासदार भावना गवळी यांच्या अडचणी वाढणार
  • गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला अटक
  • कोण आहे सईद खान? गवळी यांच्याशी त्याचे कनेक्शन काय?

परभणी । नजीर खान

शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यावरील मनी लॉण्ड्रिंगचे आरोप व त्यांच्याशी संबंधित संस्थांतील घोटाळ्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं (ED) आज सईद खान याला मुंबईतून अटक केली आहे. सईद खान हा गवळी यांचा निकटवर्तीय समजला जातो. गवळी यांच्या अनेक आर्थिक व्यवहारांशी खान याचा थेट संबंध असल्याचं बोललं जातं.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर सर्वप्रथम घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर गवळी या ईडीच्या रडारवर आल्या आहेत. याच आरोपांच्या अनुषंगानं ईडीनं मागील महिन्यात मोठी कारवाई करत गवळी यांच्या विविध संस्थांवर धाडी टाकल्या. त्याच दिवशी परभणी जिल्ह्यातील पाथरी इथं ईडीची कारवाई झाली होती. मात्र, वाशिम आणि परभणीमध्ये एकाच दिवशी पडलेल्या धाडींमध्ये कनेक्शन काय, अशी चर्चा सुरू झाली होती. त्याचा उलगडा आता झाला आहे.

वाचा: ईडीची मोठी कारवाई; खासदार भावना गवळी यांचा निकटवर्तीय अटकेत

परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील रहिवासी असलेला सईद खान हा मोठा कंत्राटदार आहे. तो गवळी यांचे निकटवर्तीय मानला जातो. कंत्राटदार असल्यानं कामाच्या निमित्तानं सईद हा भावना गवळी यांच्या संपर्कात आला. खान याच्या माध्यमातून भावना गवळी यांनी आजवर अनेक मोठमोठी कामं केली असल्याचं बोललं जातं. ईडीनं तूर्त गवळी यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. मात्र, खान याच्या अटकेनंतर गवळी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

किरीट सोमय्या यांचं सूचक ट्वीट

सईद खान यांना अटक होताच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्वीट केलं आहे. ‘वाशिम इथं मला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मास्टरमाइंडला ईडीनं आज पहाटे अटक केली आहे,’ असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: