शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणी वाढल्या; निकटवर्तीय सईद खान यांना अटक


हायलाइट्स:

  • मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई
  • खासदार भावना गवळी यांचे विश्वासू सईद खान यांना अटक
  • गवळी यांच्या कारखान्यात घोटाळा झाल्याचा आहे आरोप

वाशिम: ईडीच्या रडारवर असलेल्या महाविकास आघाडीला विशेषत: शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली आहे. ‘एएनआय’नं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. सईद खान यांना आजच न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. (ED arrested Close Aide of Shiv Sena MP Bhavana Gawali)
खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीनं गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या यवतमाळ व वाशिम येथील पाच संस्थांवर याआधीच छापे टाकले होते. वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीने येथून अनेक कागदपत्रे जप्त केली होती. भावना गवळीशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्याशिवाय, गवळी यांच्या एका संस्थेच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार स्वत: गवळी यांनी केली होती. त्या तक्रारीनंतर सोमय्या यांनी गवळी यांच्यावर निशाणा साधला होता. इतके पैसे गवळी यांच्याकडं आले कुठून, असा सवाल त्यांनी केला होता. तसंच, चौकशीची मागणीही केली होती. तेव्हापासून गवळी ईडीच्या रडारवर असून त्यांच्यावर झालेल्या आरोपांची शहानिशा ईडीकडून केली जात आहे. याच प्रकरणात सईद खान यांना अटक केल्याचं समजतं.

सईद खान हे परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील रहिवासी आहेत. ते मोठे कंत्राटदार असून गवळी यांचे आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

अनिल परब ईडीच्या कार्यालयात

ईडीनं गवळी यांच्या निकटवर्तीयास अटक केलेली असतानाच, दुसरीकडं परिवहन मंत्री अनिल परब हे चौकशीसाठी ईडीच्या बलार्ड पीयर येथील कार्यालयात पोहोचले आहेत. मागील महिन्यात परब यांना ईडीनं समन्स बजावलं होतं. मात्र, गणेशोत्सव असल्यानं त्यांनी वेळ मागून घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आलं. त्यानुसार, आज ते ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत.

आणखी वाचा:

LIVE औरंगाबादसह मराठवाड्यात पावसाचा कहर, प्रचंड नुकसान

मोठी बातमी! प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पुराच्या पाण्यात गेली वाहूनSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: