कोल्हापुरात म्हासुर्लीत ओढय़ावरील नवीन पुलाचा भराव खचला, भेगा पडल्याने रस्ता धोकादायक


कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली येथील दलित वस्तीकडे जाणाऱ्य़ा मार्गावरील लेंडोरी ओढय़ावरील नवीन बांधण्यात आलेल्या पुलाचा भराव खचला आहे. या रस्त्याला भेगा पडल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. तरी संबंधित विभागाने याची दखल घेऊन निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

म्हासुर्ली येथील दलित वस्तीसह गावच्या शेतशिवाराकडे जाणाऱ्य़ा रस्त्यावरील लेंडोरी नावाच्या ओढय़ावर नवीन पूल बांधकामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे 31 लाख 34 हजार रुपयांचा निधी मंजूर केला. ओढय़ावर डिसेंबर 2020 मध्ये ठेकेदाराने प्रत्यक्ष काम सुरू करून अवघ्या काही दिवसांत पुलाचे काम पूर्ण केले आहे. मात्र, ठेकेदाराने पुलाच्या दोन्ही बाजूंनी योग्यरीत्या मुरमाचा भराव व रोलिंग योग्य केले नसल्याने भरावाला मोठय़ा भेगा पडल्या आहेत. तसेच, भराव खचत असल्याने सदर पूल वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. सध्या पावसाळा असून, ओढय़ाला येणाऱ्य़ा पुरामुळे भराव वाहून जाऊन वाहतूक बंद पडण्याची भीती ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. तसेच,  बांधकामच्या अधिकाऱ्य़ांनी याची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सदाशिव कांबळे यांनी केली.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: