दरवाढीचा दणका ; चार दिवसांत तिसऱ्यांदा डिझेल महागले, हा आहे आजचा दर


हायलाइट्स:

  • पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे.
  • आज सलग दुसऱ्या दिवशी कंपन्यांनी डिझेल दरवाढ केली.
  • चार दिवसांत डिझेल ७० पैशांनी महागले आहे.

मुंबई : जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या महागाईचा भार आता कंपन्यांनी ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केली आहे. आज सोमवारी कंपन्यांनी डिझेल दरात २५ पैशांची वाढ झाली. सलग दुसऱ्या दिवशी डिझेल महागले आहे तर पेट्रोलचा दर स्थिर आहे.

बिग बँंक फाॅर्म्युल्याचे अर्थमंत्री सितारामन यांनी केलं समर्थन म्हणाल्या…
कच्च्या तेलातील महागाईची झळ सोसत सलग १८ दिवस इंधन दरवाढ रोखून धरणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी डिझेल २० पैशांची वाढ केली होती. त्यानंतर शनिवारी इंधन दर स्थिर ठेवले. काल रविवारी डिझेलमध्ये २५ पैशांची वाढ करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा डिझेलमध्ये २५ पैसे वाढ केली आहे. चार दिवसांत डिझेल ७० पैशांनी महागले आहे. तर पेट्रोलचा भाव २२ व्या दिवशी स्थिर आहे.

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९६.९४ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.३२ रुपये झाला आहे. चेन्नईत ९३.९३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.४२ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.१८ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.८० रुपये आहे.

कधी येणार LICचा आयपीओ; अर्थ मंत्रालयाच्या ‘सीईए’नी दिली माहिती
देशभरात पेट्रोलचा भाव मात्र स्थिर आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२६ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.१९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९८.९६ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.६२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.६३ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.७० रुपये झाले आहे.

सोनं-चांदी झालं स्वस्त ; ‘या’ कारणाने सोने-चांदीच्या किमतीत झालीय घसरण
दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. आज सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव ७९.१५ डॉलर प्रती बॅरल इतका वाढला. त्यात १.०६ डॉलरची वाढ झाली. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ७५.०२ डॉलर झाला. त्यात १.०४ डॉलरची वाढ झाली. मेक्सिकोच्या आखातातील तेल उत्पादक काही युनिट्स या वर्षाच्या अखेरीस इडा चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे ऑफलाइन राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: