चिनी लशीचा दिलासा! डेल्टा वेरिएंटविरोधात ७९ टक्के प्रभावी असल्याचा दावा


बीजिंग: जगभरात करोना महासाथीच्या आजाराचा जोर अजूनही कायम आहे. करोना विषाणूच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे संसर्गावर नियंत्रण ठेवणे अधिक आव्हानात्मक होत चालले आहे. करोनाच्या डेल्टा वेरिएंटमुळे बाधितांची संख्या वाढत आहे. करोनाच्या संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. तर, चीनमध्ये आणखी एक लस उपलब्ध होणार आहे. ही लस डेल्टा वेरिएंटवर ७९ टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. तर, करोनाच्या इतर प्रकारांवर ६७ टक्के प्रभावी ठरली आहे.

ही प्रोटीन आधारित लस चेंग येथील क्लोवर फार्मा कंपनीने विकसित केली आहे. ग्वांगझोउच्या लस तज्ज्ञांनी ग्लोबल टाइम्सला सांगितले की, डेल्टा, गॅमा आणि म्यू या म्युटेशनविरोधात प्रभावी ठरणारी SCB-2019 ही जगातील पहिली लस आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गॅमा वेरिएंटविरोधात ९२ टक्के आणि म्यू वेरिएंटविरोधात ५९ टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले. क्लोवरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हटले की, कँडिटेड वॅक्सिन SCB-2019 या लशीने डेल्टा आणि इतर गंभीर वेरिएंटविरोधात प्रभावी असल्याचे दाखवून दिले आहे. डेल्टा वेरिएंटविरोधात ही लस ७९ टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

२९ देशांमध्ये बनावट करोना लसीकरण प्रमाणपत्रात १० पटीने वाढ!
या लशीच्या चाचणीत ३० हजार वयस्करांवर करण्यात आली. यामध्ये फिलीपाइन्स, ब्राझील, कोलंबिया, दक्षिण आफ्रिका, बेल्जियम आदी देशांमधील ३१ ठिकाणी लस चाचणी करण्यात आली.

करोनाचा जोर ओसरला! जगभरातील बाधितांच्या संख्येत घट
कंपनीकडून जागतिक आरोग्य संघटना, चिनी प्राधिकरण आणि युरोपीयन युनियनकडून मंजुरी मिळवण्यासाठी चाचणी अहवाल २०२१ च्या चौथ्या तिमाहीत सादर करण्यात येणार आहे. चीनमध्ये करोना लसीकरणासाठी सिनोवॅक आणि सिनोफार्म लशीचा वापर करण्यात येत आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: