तेजी कायम ; शेअर बाजारात सेन्सेक्स – निफ्टीची घोडदौड सुरूच


हायलाइट्स:

  • सेन्सेक्स आणि निफ्टीने आपली विजय घोडदौड कायम ठेवली.
  • आज बाजार सुरु होताच सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला.
  • निफ्टीने १७९५० अंकापर्यंत मजल मारली.

मुंबई : भांडवली बाजारातील तेजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कायम राहिली. सेन्सेक्स आणि निफ्टीने आपली विजय घोडदौड कायम ठेवली. आज बाजार सुरु होताच सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला तर निफ्टीने १७९५० अंकापर्यंत मजल मारली. दुपारच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांना नफावसुलीची झळ बसली होती. मात्र त्यातून ते सावरले.

पडझड थांबली ; जाणून घ्या आज सोने-चांदी किती रुपयांनी महागलेआजच्या सत्रात बँका, वित्त संस्था, रियल इस्टेट, ऑटो या क्षेत्रात खरेदीचा ओघ दिसून आला. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा, टीव्हीएस मोटर्स, हिरो मोटो कॉर्प, बजाज ऑटो या शेअरमध्ये वाढ झाली आहे. तर बँकिंग क्षेत्रात कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, एसबीआय, पीएनबी बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा, युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक या बँकांचे शेअर तेजीत आहे.

उच्च परतावा आणि कमी जोखीम ; सॅमको एसेट मॅनेजमेंटने सुरु केली पहिल्यांदाच ही सुविधा
दरम्यान, देशात इंधन दर वाढल्याने आज ओएनजीसीच्या शेअरमध्ये खरेदीचा ओघ दिसून आला. आज ओएनजीसीचा शेअर २ टक्क्यांनी वधारला. आज आयटी सेवा पुरवठादार कंपन्यांच्या शेअरला नफावसुलीची झळ बसली. विप्रो, एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, माइंड ट्री, टीसीएस या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

आरोग्यसेवा क्षेत्राला पत पुरवठा; कोटक महिंद्रा बॅंक देणार आरोग्यविषयक गरजांसाठी कर्ज
गेल्या आठवड्यात तेजीने दौडणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीला आज दुपारच्या सत्रात नफावसुलीचा फटका बसला आहे. बाजार सुरु होताच सकारात्मक सुरुवात करून देखील दोन्ही निर्देशांकात घसरण झाली होती. सेन्सेक्स ४९ अंकांनी घसरला होता. मात्र त्यातून दोन्ही निर्देशांक सावरले. सध्या सेन्सेक्स २२ अंकांनी वधारून ६००७१ अंकांवर आहे. निफ्टी १५ अंकांनी वधारून १७८६२ अंकावर आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram