पडझड थांबली ; जाणून घ्या आज सोने-चांदी किती रुपयांनी महागले


हायलाइट्स:

  • आज सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली.
  • आज सोन्याचा भाव पुन्हा ४६ हजारांवर गेला आहे.
  • चांदीमध्ये आज ७०० रुपयांची वाढ झाली.

मुंबई : कमॉडिटी बाजारात सुरु असलेल्या नफावसुलीला आज ब्रेक लागला आहे. आज सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली. आज सोन्याचा भाव पुन्हा ४६ हजारांवर गेला आहे. चांदीमध्ये आज ७०० रुपयांची वाढ झाली.

बिग बँंक फाॅर्म्युल्याचे अर्थमंत्री सितारामन यांनी केलं समर्थन म्हणाल्या…
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४६०१८ रुपये आहे. त्यात २३ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी सोन्यामध्ये १६८ रुपयांची वाढ झाली होती आणि सोन्याचा भाव ४६१८६ रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो चांदीचा भाव ६०३११ रुपये आहे. त्याआधी चांदीने ६०६९३ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती.
पुढील महिन्यात २० दिवस बँंकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँंका राहणार बंद, जाणून घ्या
एमसीएक्सवर शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४५९९५ रुपयांवर स्थिरावला. त्यात ६१ रुपयांची घसरण झाली. त्याआधी तो ४५७८७ रुपयांपर्यंत खाली घसरला होता. एक किलो चांदीचा भाव ५९९२० रुपयांवर बंद झाला. त्यात ८६९ रुपयांची घसरण झाली होती.

तब्बल ९ वर्षांनंतर टाटा समूहाला मिळाले ‘हे’ कंत्राट; रतन टाटा म्हणाले…
Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५२४० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४६२४० रुपयांवर स्थिर आहे. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५३५० रुपयांवर स्थिर आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४९४८० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४३६९० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७६६० रुपये आहे. त्यात १३० रुपयांची वाढ झाली. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८६०० रुपयांवर स्थिर आहे.

कधी येणार LICचा आयपीओ; अर्थ मंत्रालयाच्या ‘सीईए’नी दिली माहिती
अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने नुकत्याच झालेल्या बैठकीत पतधोरण बदलले नसले, तरी अपेक्षेपेक्षा लवकर आर्थिक पाठबळ काढून घेण्याची योजनेचा स्पॉट सोन्याच्या किंमतींवर परिणाम दिसून आला. गुरुवारी स्पॉट गोल्ड १.३ टक्क्यांहून अधिक घसरून प्रति औंस १७४२.६ डॉलरवर बंद झाला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: