कोरोनामुक्तीच्या दिशेने; राज्यात 6 हजार 270 नवे रुग्ण


महाराष्ट्र राज्य हळूहळू कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. एकीकडे लसीकरणाचा वेग वाढत असतानाच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमुळे राज्यातील रुग्णांची आकडेवारीही दिवसेंदिवस कमी होत आहे. राज्यात आज दहा हजारांखाली कोरोना रुग्णांची संख्या नोंदवली गेली असून 6,270 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर 13,758  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  95.89 टक्के एवढे झाले आहे.

मुंबईत 521 नवे कोरोनाबाधित

मुंबईत गेल्या 24 तासात 521 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.  मुंबईत आजवर 6,89,675 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 14, 637 ऑक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 720 दिवसांवर गेला आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: