WTC FINAL : आनंदाची बातमी… चौथ्या दिवसाच्या खेळाबाबत आली ही गूड न्यूज, पाहा नेमकं काय घडलं


साऊदम्पटन : चौथ्या दिवसाच्या खेळाबाबत चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. साऊदम्पटन येथील मैदानातून एक महत्वाची अपडेट्स आली आहे.

काय आहे आनंदाची बातमी, जाणून घ्या…
साऊदम्पटनच्या मैदानात दिवसाच्या सुरुवातीला जोरदार पाऊस सुरु होता. पण आता तेथील पाऊस जवळपास थांबलेला आहे. त्यामुळे कर्मचारी आता मैदानात शिरलेले असून त्यांनी युद्धपातळीवर मैदानातील पाणी बाहेर काढण्याचे काम सुरु केले आहे. त्याचबरोबर काही वेळात मैदान आणि खेळपट्टीवर टाकण्यात आलेले कव्हर्सही काढण्यात, येतील असे म्हटले आहे. त्यानंतर पंच आणि सामनाधिकारी मैदानात जातील आणि परिस्थितीची पाहणी करतील. मैदानातील पाणी जेवढ्या लवकर काढण्यात येईल तेवढ्या लवकर हा सामना सुरु होऊ शकतो. कारण मैदान निसरडे असेल तर सामना सुरु व्हायला विलंब लागू शकतो. सध्याच्या घडीला सुपर सॉपर्स हे यंत्र पाणी काढण्यासाठी लावण्यात आले आहे. हे यंत्र मैदानातील पाणी काढून ते बाहेर टाकते, त्यामुळे मैदानातील ओलावा लवकर कमी होऊ शकतो. मैदानातील पाणी काढल्यावर स्पंजचे रोलरही फिरवले जाऊ शकतात, कारण पाणी काढल्यावर मैदानात काहीसा ओलावा असतो, तो ओलावा हे रोलर शोषून घेते. त्यामुळे आता काही वेळातच सामना सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत.

काय आहे चौथ्या दिवशीचा हवामानाचा अंदाज, पाहा…

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. पण सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चांगला खेळ झाला. आता सामन्याच्या चौथ्या दिवसाबाबत हवामान खात्याने काय सांगितले आहे, ते पाहुया. हवामान खात्याने चौथ्या दिवसाबाबत सांगितले होते की, ” सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला पाऊस पडेल. त्यामुळे कदाचित या दिवसाचे पहिले सत्र होऊ शकणार नाही. पण पहिल्या सत्राच्या अखेरीस पाऊ थांबेल. त्यामुळे चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्राचा खेळ होऊ शकतो.” त्यामुळे आज चौथ्या दिवशी चाहत्यांना क्रिकेटचा सामना दुसऱ्या सत्रात पाहायला मिळू शकतो. त्यामुळे दुसऱ्या सत्रात भारतीय संघ नेमका कशी गोलंदाजी करतो आणि न्यूझीलंडला किती धावांमध्ये सर्वबाद करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

फायनल (सौजन्य-ट्विटर)

चौथ्या दिवशी पहिल्या आणि तिसऱ्या सत्राचा खेळ खराब होऊ शकतो. तर दुसऱ्या सत्रात देखील ढगाळ हवामान असेल. सामना सुरू होण्याआधी सकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी ६० टक्के पावसाची शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी १० ते १२ या काळात पाऊस, त्यानंतर दुपारी एक ते तीन ढगाळ वातावरण आणि चार ते सहा यावेळेत पुन्हा पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सत्राच्या खेळात भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात, यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: