कॉलेजमधील तरुणीने नदीत घेतली उडी; शोधकार्य सुरू


हायलाइट्स:

  • तरुणीनं मांजरा नदीच्या पुलावरून पाण्यात घेतली उडी
  • पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने तरुणी गेली वाहून
  • रविवारीही शोध कार्य सुरूच

लातूर : शहरातील एका महाविद्यालयीन तरुणीनं मांजरा नदीच्या पुलावरून पाण्यात उडी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने ही तरुणी वाहून गेली असून तिचा शोध सुरू आहे.

पल्लवी साबळे असं पाण्यात नदीत उडी घेतलेल्या तरुणीचं नाव असून ती लातूर शहरातील गायत्री नगर येथील रहिवासी आहे. पल्लवीने शनिवारी २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नदीत उडी घेतली.

विकृतीचा कळस! पेट्रोल दिलं नाही म्हणून मित्रालाच पेटवलं

सदर तरुणीने पुलावरून नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर लातूर मनपाचे आपत्ती व्यावस्थापन पथक व रेणापूर पोलिसांनी १० किलोमीटरपर्यंतच्या नदी पात्रात शोध घेतला. मात्र वाहून गेलेली तरुणी सापडली नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीही शोध कार्य सुरूच होते. सदर तरुणीने नदीत उडी घेण्यामागील कारण अद्याप समजू शकलं नाही.

दरम्यान, या घटनेनंतर साबळे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: