परळी तालुक्यातील गतिमंद मुलीवर वर्षभरापासून अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल


परळी तालुक्यातील एका 21 वर्षीय गतिमंद मुलीवर एका तरुणाने वर्षभरापासून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. गोविंद मुंजाजी रुद्रे (वय 21, रा. वडगाव, ता.जि. संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी गतिमंद आहे. गोविंद रुद्रे हा नेहमी त्यांच्या घरी येत असे. मागील वर्षापासून लॉकडाऊनमुळे त्याचे इकडे राहणे वाढले होते. पीडिता गतिमंद असल्याचा गैरफायदा घेत मागील वर्षभरापासून गोविंदने घरात कोणी नसताना तिच्यावर अत्याचार केला. यातून पीडिता गर्भवती राहिल्याने ही धक्कादायक घटना उघड झाली आहे.

तक्रारीवरून आरोपीवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास फौजदार मोनाली पवार करत आहेत. गुन्हा दाखल होताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांचे पथक फरार आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले.आरोपी संभाजीनगरला असल्याची खबर मिळाल्यानंतर या पथकाने त्याचा पाठलाग करत त्याला काही तासातच बेड्या ठोकून अंबाजोगाईला आणले. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: