प्रत्येक कसोटीत ५ विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला झाले तरी काय? ठरतोय संघाच्या अपयशाचे कारण


साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या चौथ्या दिवसाचा खेळ अद्याप सुरू झालेला नाही. साउदम्प्टन येथे सकाळपासून पाऊस पडत आहे. भारताने केलेल्या २१७ धावांच्या उत्तरात न्यूझीलंडने २ बाद १०१ धावा केल्या असून ते अद्याप ११६ धावांनी पिछाडीवर आहेत.

वाचा- क्रिकेटपटू भडकला; WTC फायनलवरून ICC ला सुनावले, यापुढे…

तिसऱ्या दिवशी भारताच्या जलद गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. यात आघाडीचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहचा देखील समावेश होते. पण बुमराह सध्या खराभ फॉर्ममध्ये आहे.

वाचा- फक्त मैदानावरील कामगिरीने नव्हे तर सौंदर्याने घायाळ करणारी भारताची क्रिकेटपटू

WTC फायलनमध्ये त्याने पहिल्या ११ षटकात ३च्या सरासरीने धावा दिल्या आणि त्याला एक ही विकेट घेता आली नाही. यामुळेच बुमराहच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह ११व्या स्थानावर आहे आणि त्याची लय गेल्या दीड वर्षाापासून बिघडली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये न्यूझीलंड दौऱ्यापासून बुमराह भरकटला आहे. त्या दौऱ्यात बुमराहने ४ कसोटीत ६ विकेट घेतल्या होत्या. न्यूझीलंडमधील कामगिरीनंतर तो पुन्हा लय मिळवेल असे वाटत होते. पण तसे झाले नाही. त्यानंतर १० डावात बुमराह फक्त १५ विकेट घेऊ शकला.

वाचा- विकेट मिळवण्यासाठी सुरु आहे संघर्ष; भारतीय संघाने केली मोठी चूक

न्यूझीलंड दौऱ्याआधी बुमराहने १२ कसोटीत ६२ विकेट घेतल्या होत्या. त्याची सरासरी प्रत्येक कसोटीत ५ विकेट अशी होती. पण त्यानंतर सात कसोटी तसे दिसले नाही. या सात कसोटीत बुमराहने फक्त २१ विकेट घेतल्या. WTC फायनलमध्ये पोहोचण्याआधी त्याने १९ कसोटी खेळल्या ज्यात ८३ विकेट घेतल्या आहेत.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराहने ३ वनडेत चार आणि चार कसोटीतील ६ डावात ११ विकेट घेतल्या होत्या. अखेरच्या कसोटीच्या आधी बुमराहला दुखापत झाली होती. त्यामुळे तो थेट इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत खेळला. या दोन कसोटीत बुमराहला फक्त ४ विकेट घेता आल्या. त्यानंतर त्याने लग्नासाठी सुट्टी घेतली होती.

वाचा- चौथ्या दिवसाच्या खेळ रद्द झाला, पाहा बीसीसीआय काय म्हणाले

का अपयशी ठरतोय

२०१८ साली कसोटीत पदार्पण करणाऱ्या बुमराहची एक्शन वेगळी असल्याने तो चर्चात होता. त्याने १२ कसोटीत ६५ विकेट घेतल्या होत्या. पण आता फलंदाज बुमराहची एक्शन समजू लागले आहेत. त्यामुळे त्याला विकेट मिळत नाहीत. त्याच बरोबर २०१९ साली पाठीच्या दुखापतीमुळे तो दोन महिने क्रिकेटपासून दूर होता. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात स्ट्रेस फॅक्चर झाले होते. त्यामुळे तो ४ महिने मैदानाबाहेर होता. या दुखापतीनंतर तो न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आणि तेथूनच त्याचा फॉर्म खराब झाला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: