दिलासादायक आकडेवारी! राज्यात आज 6,270 नवीन कोरोनाबाधितांची नोंद


राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख उतरताच असून आज 6 हजार 270 कोरोना बाधितांची नोंद झाली. तसेच गेल्या 24 तासात 13 हजार 758 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 94 रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून 10 हजारांच्या खाली आला आहे. राज्यात आजपर्यंत 57 लाख 33 हजार 215 रुग्ण कोरोनामुक्त झाली आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.89 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 94 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.98 टक्के एवढा आहे.

दरम्यान, सध्या राज्यात 6,71,685 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,472 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच 1 लाख 24 हजार 398 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

मुंबई-पुण्यातील रुग्णसंख्येत घट

मुंबईत गेल्या 24 तासात 521 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 14, 637 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दुसरीकडे पुण्यात आज 136 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर 223 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. पुणे शहरात 2 हजार 470 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: