धक्कादायक: मुंबईत हत्याराचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपी परिचयातील!


हायलाइट्स:

  • हत्याराचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार.
  • मुंबईतील चेंबूर येथील धक्कादायक घटना.
  • आरोपी तरुणीच्या परिचयातील असल्याचे समोर.

मुंबई:मरिन ड्राइव्ह येथे रात्री फेरफटका मारल्यानंतर पहाटे घरी परतणाऱ्या तरुणीवर चेंबूर येथे बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्याराचा धाक दाखवून अत्याचार करण्यात आल्याचा आरोप तरुणीने केला असून पोलिसांनी काही तासांतच या नराधमाला अटक केली आहे. आरोपी हा तरुणीच्या परिचयातील असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ( Mumbai Chembur Rape Latest News )

वाचा: आईचा अपघाती मृत्यू, वडील गंभीर; पैशांची जुळवाजुळव करत असतानाच…

चेंबूर कॅम्प परिसरात राहणारी तरुणी शुक्रवारी रात्री आपल्या मित्रासोबत फिरायला मरिन ड्राइव्ह येथे पोहोचली. रात्री या ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर शनिवारी पहाटे दोघेही वाहनाने चेंबूर कॅम्प परिसरात आले. पहाटे तीनच्या सुमारास वाहनातून उतरून दोघेही घराच्या दिशेने पायी चालत असताना तरुणीला ओळखणारा धीरज हा त्याठिकाणी आला. त्याने दोघांनाही हत्याराचा धाक दाखवत घाबरविले. त्यावेळी तरुणीच्या मित्राने तिला एकटेच सोडून पळ काढला. त्यानंतर हत्याराच्या धाकावर धीरज या तरुणीला घेऊन येथील नॅशनल कॉलेजच्या समोरील गल्लीमध्ये गेला. निर्मनुष्य असलेल्या या गल्लीमध्ये त्याने बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्यासह चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

वाचा: करोनाबाबत दिलासा देणारे अपडेट्स; ‘ही’ आहे राज्यातील आजची आकडेवारी

चेंबूर पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करून तत्काळ वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. तपासामध्ये आरोपी धीरज याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली. तपास कौशल्य आणि खबरे यांच्या मार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी चेंबूर तसेच आजूबाजूचा परिसर पिंजून काढत धीरज याला अटक केली.

वाचा: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; राज्यात ऑक्सिजनबाबत गाइडलाइन्स जारीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: