Live Updates PM Modi in UNGA दहशतवादाचा भस्मासूर तुमच्यावर उलटेल; पंतप्रधान मोदींचा पाकला इशारा


न्यूयॉर्क: पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर केलेल्या आरोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी काय प्रत्यु्त्तर देतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील (PM Modi speech in UNGA) ठळक मुद्दे:

>>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:

> जागतिक कायदे, नियम, मूल्यांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्राला आणखी बळकट करण्याची आवश्यकता: पंतप्रधान मोदी

> आपले समुद्र आपला वारसा आहे, त्यामुळे समुद्रातील साधनसंपत्तीचा योग्य वापर झाला पाहिजे: पंतप्रधान मोदी

> अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद पोसण्यासाठी आणि दहशतवादी हल्ल्यांसाठी होता कामा नये: पंतप्रधान मोदी

>> दहशतवादाचा वापर राजकीय हत्यार म्हणून वापर करणाऱ्यांनी एक लक्षात घ्यावं की, दहशतवाद हा त्यांच्यासाठीही मोठा धोका आहे; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

> आज जगातील सहावी व्यक्ती भारतीय; भारताची प्रगती होते, तेव्हा जगाच्या विकासाला गती मिळते: पंतप्रधान मोदी

> अफगाणिस्तानमधील महिला, अल्पसंख्याक समुदायाला मदतीची गरज आहे, त्यांना मदत करावीच लागणार: पंतप्रधान मोदी

> भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना भारताकडून ७५ उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार; ही उपग्रहे भारतातील विद्यार्थ्यांनी तयार केलेली असणार: पंतप्रधान मोदी

> भारत हा अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखून आहे : पंतप्रधान मोदी

> करोना महासाथीच्या आजारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम: पंतप्रधान मोदी

> जगभरातील लस उत्पादकांना लस निर्माण करण्यासाठी भारतात येण्याचे आमंत्रण: पंतप्रधान मोदी

> संपूर्ण जगात मागील १०० वर्षातील सर्वात मोठी महासाथ; या महासाथीच्या आजारात प्राण गमावलेल्यांना आदरांजली: पंतप्रधान मोदी

>>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला थोड्याच वेळात सुरूवात

>> न्यूयॉर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात दाखलSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: