दोन दिवसात खूनाच्या प्रयत्नाच्या चार घटना


एकमेकांकडे पाहण्याच्या किरकोळ कारणातून शहरातील स्वारगेट येथील इंदिरानगर वसाहत, बोपोडी व फुरसूंगी परिसरात खूनाचा प्रयत्न केल्याच्या चार घटना घडल्या आहेत. याप्रकरणी स्वारगेट, हडपसर व खडकी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकमेकांकडे पाहण्याच्या कारणातून झालेल्या वाद झाला होता. त्या वादातून खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गटांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास वाडेकर हॉस्पिटल खड्डा इंदिरानगर वसाहत येथे घडली आहे. अशपाक मुन्ना शेख (वय.36), सुलतान करीम शेख (वय.23,राहणार दोघेही इंदिरानगर गुलटेकडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर इतर दोघांसह चौघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ कसबे (वय.24,रा. इंदिरानगर गुलटेकडी) यांनी याप्रकरणी तक्रार दिली.

पूर्वीच्या भांडणातून आरोपींची गोट्या क्षीरसागर व सैफअली बागवान यांच्यासोबत वाद सुरू होता. त्यावेळी हसन व सुलतान या दोघांनी सौरभकडे पाहून शिवीगाळ केली. हा सुद्धा त्यांच्यात असतो याचाही काटा काढू असे म्हणत त्याला ठार करण्याच्या उद्देशाने दगड व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानुसार चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन अशपाक व सुलतान या दोघांना अटक केली. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग करीत आहेत.

अशपाक मुन्ना शेख (वय.36,रा. इंदिरानगर गुलटेकडी) याने दिलेल्या तक्रारीनुसार, भिमराव नरसाप्पा मानपाडे (वय.20) व कृष्णा सुनिल क्षीरसागर (वय.20,रा. दोघेही समाजमंदीर चौक गुलटेकडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराचा मुलगा मोबीन अशपाक शेख याचे आरोपी भिमराव व कृष्णा सोबत एकमेकांकडे पाहण्याच्या कारणातून वादावादी झाली होती. यावेळी दोघांनी मोबीन याला लाथाबुक्यांनी मारहाण करून, तक्रारदार अशपाक यांनाही डोक्यात सिमेंटच्या विटांनी मारुन जखमी केले होते. तसेच अशपाक यांचा भाचा सुलतान शेख याला लोखंडी वस्तूसह लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. अशपाक व सुलतान या दोघांना आरोपींनी ठार करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तुषार भोसले करीत आहेत.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: