DCvsRR : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पंत सेहवागचा रेकॉर्ड मोडणार?


IPL 2021 : नवी दिल्ली : आयपीएल २०२१ चा ३६ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शनिवारी (२५ सप्टेंबर) अबू धाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. दिल्लीचं नेतृत्व रिषभ पंत, तर राजस्थानचं नेतृत्व संजू सॅमसन करणार आहे. या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही संघाचे यष्टीरक्षक नेतृत्व करत असल्याने त्यांच्यात एक स्वतंत्र लढाई देखील पाहायला मिळणार आहे. सध्या पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा संघ तुफान फॉर्मात आहे.

आयपीएल २०२१ च्या ९ सामन्यांमध्ये १४ गुण मिळवत दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. जर पंतचा संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी झाला, तर तो पुन्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचेल.

२३ वर्षीय पंत राजस्थानविरुद्ध मोठा विक्रम नोंदवू शकतो. दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे.

सेहवागने दिल्लीसाठी केल्या २३८२ धावा
सेहवागने दिल्लीसाठी ८६ सामन्यांच्या ८५ डावांमध्ये एक शतक आणि १७ अर्धशतकांच्या मदतीने एकूण २३८२ धावा केल्या आहेत. सेहवाग २००८ पासून २०१३ पर्यंत दिल्लीकडून खेळला.

पंत मोडणार सेहवागचा विक्रम?
राजस्थानविरुद्ध पंतने ५६ धावा केल्या, तर तो नवा विक्रम आपल्या नावावर करेल. डावखुरा फलंदाज पंतने दिल्लीसाठी ७७ सामन्यांत एक शतक आणि १४ अर्धशतकांसह एकूण २३२७ धावा केल्या आहेत.

दरम्यान, आयपीएल २०२१ च्या सध्याच्या हंगामात रिषभ पंतने ९ सामन्यांत २४८ धावा केल्या आहेत, ज्यात त्याने २ अर्धशतके झळकावली आहेत. या दरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ५८ राहिली आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: