Kamla Bhasin: प्रख्यात महिलावादी लेखिका-सामाजिक कार्यकर्त्या कमला भसीन यांचं निधन


हायलाइट्स:

  • कमला भसीन यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी निधन
  • शनिवारी पहाटे घेतला अखेरचा श्वास
  • लेखनाच्या माध्यमातून लैंगिक भेदभावावर परखड भाष्य

नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या कमला भसीन यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालंय. शनिवारी पहाटेच ३.०० वाजल्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कमला भसीन हे भारत तसंच दक्षिण आशियाई देशांत महिलां आंदोलनातील एक आघाडीचं नाव होतं. महिलावादी आंदोलनाला कमला भसीन यांची कमतरता कायम भासत राहील, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांना आदरांजली व्यक्त करण्यात येतेय.

कमला भसीन यांनी पहाटे ३.०० वाजता अखेरचा श्वास घेतला. भारत आणि दक्षिण आशियाई क्षेत्रात महिला आंदोलनासाठी हा एक मोठा झटका आहे. विपरीत परिस्थितीतही त्यांनी आयुष्याचा आनंद साजरा केला. कमला, तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात जिवंत असाल, असं ट्विट करत सामाजिक कार्यकर्त्या कविता श्रीवास्तव यांनी कमला भसीन यांना आदरांजली व्यक्त केलीय.

IFS Sneha Dubey: संयुक्त राष्ट्रासमोर पाक पंतप्रधानांना तोंडावर पाडणाऱ्या IFS स्नेहा दुबे चर्चेत
India Pakistan: ‘आधी, POK रिकामा करा’, आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचं पाक पंतप्रधानांना प्रत्यूत्तर
अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांनीही आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. कमला भसीन यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ‘कमला भसीन अखेरपर्यंत लढल्या, गायन आणि आयुष्याचा आनंद साजरा केला. त्यांची अनुपस्थिती नेहमीच जाणवत राहील. साहसी उपस्थिती, हास्य आणि गीत हाच त्यांचा वारसा आहे’ असं आझमी यांनी म्हटलंय.

महिलांचा आवाज ठरलेल्या कमला भसीन यांचा जन्म २४ एप्रिल १९४६ मध्ये झाले होता. १९७० पासूनच त्यांनी महिलांसाठी काम सुरू केलं होतं. लैंगिक भेदभाव, शिक्षण, मानव विकास, मीडिया अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये त्या रमल्या. आपल्या लिखाणाच्या माध्यमातून लैंगिक समानता, महिलावाद आणि पितृसत्तेच्या मुद्द्यांवर त्यांनी आपले विचार मांडले. आजवर त्यांची पुस्तकं इतर अनेक भाषांत अनुवादीत होऊन वाचकांपर्यंत पोहचली आहेत.

२००२ साली कमला भसीन यांनी एका ‘संगत’ नावाच्या महिलावादी संघटनेची स्थापना केली होती. या माध्यमातून त्यांनी ग्रामीण आणि आदिवासी समाजातील वंचित महिलांसाठी काम केलं. या महिलांपर्यंत पोहचण्यासाठी नाटक, लोकगीते, कला यांसारख्या सोप्या – सरळ माध्यमाचा त्यांनी वापर केला.

Gulab Cyclone: ‘गुलाब’ चक्रीवादळ आंध्र प्रदेश, ओडिशाकडे सरकतंय, IMD कडून सतर्कतेचा इशारा
चन्नी मंत्रिमंडळ विस्तार : राहुल गांधींशी चर्चेनंतर मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तबSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: