WTC FINAL : फायनलमधील पावसाच्या खेळावर भडकले चाहते, भन्नाट मीम्स झाल्या व्हायरल


साऊदम्पटन : पावसाने आतापर्यंत फायनलचा खेळखंडोबा केल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण पावसामुळे फायनलचे दोन दिवस वाया गेले आहेत. त्यामुळे चाहते आता पावसावर चांगलेच भडकलेले आहेत. त्यामुळे चाहत्यांनी आता फायनलच्या पावसाबाबत मीम्स बनवायला सुरुवात केली असून सोशल मीडियावर ते आता चांगलेच व्हायरल होत आहेत.

पावसामुळे पहिल्या दिवशी टॉसही होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी देखील संपूर्ण ९० षटकांचा सामना झाला नाही. ६५ षटके खेळता आली. तिसऱ्या दिवशी ९० षटके टाकता आली नाही. खराब प्रकाशामुळे तिसऱ्या सत्रात पूर्णवेळ खेळ होऊ शकला नाही. तर आज (सोमवार) सकाळापासून पाऊस पडल्याने दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. यामुळे सर्वांची निराशा झाली.WTC फायनल सुरू झाल्यापासून पावसामुळे आयसीसीवर चाहते आणि माजी क्रिकेटपटू टीका करत आहेत. खुद्द इंग्लंडमधील क्रिकेटपटूंनी यावर नाराजी व्यक्त केली होती.

सामन्याच्या पाचव्या दिवशी काय होणार, जाणून घ्या…
सामन्याच्या पाचव्या दिवशी मात्र पाऊस पडणार नाही, पण वातावरण ढगाळ असेल. त्यामुळे सामन्याच्या पाचव्या दिवशी चांगला खेळ होऊ शकतो, असे आता समोर आले आहे. फक्त आता पाचव्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे खेळ अपुऱ्या प्रकाशामुळे थांबवला जातो का, हे पाहणे सर्वात महत्वाचे असेल. कारण सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अपुऱ्या प्रकाशामुळे काहीवेळा खेळ थांबवण्यात आला होता. त्यामुळे आता पाचव्या दिवशी असे घडू नये, अशीच आशा चाहते व्यक्त करत असतील.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: