Gulab Cyclone: ‘गुलाब’ चक्रीवादळ आंध्र प्रदेश, ओडिशाकडे सरकतंय, IMD कडून सतर्कतेचा इशारा


हायलाइट्स:

  • आंध्र प्रदेश, ओडिशाला येलो अलर्ट
  • भारतीय हवामान विभागानं दिला इशारा
  • आंध्र प्रदेशात कलिंगपटनममध्ये चक्रीवादळाच्या लँडफॉलची शक्यता

कोलकाता : काही महिन्यांपूर्वीच ‘यास’ चक्रीवादळानं देशातील समुद्रकिनारी भागांना भीतीदायक तडाखा देत दाणादाण उडवून दिली होती. आता बंगालच्या उपसागरात आणखीन एक चक्रीवादळ आकाराला येत असल्याचं समोर आलंय. पूर्व मध्य बंगाल उपसागराकडून हे चक्रीवादळ उत्तर पश्चिम दिशेनं पुढे सरकताना दिसून येतंय. (Gulab Cyclone in Andhra Pradesh And Odisha)

‘गुलाब’ चक्रीवादळ

पाकिस्तानकडून या चक्रीवादळाचं नामकरण करण्यात आलंय. या चक्रीवादळाला ‘गुलाब’ असं नाव देण्यात आलंय.

भारतीय हवामान विभागानं एक बुलेटीन जारी करत याबद्दल माहिती दिलीय. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत उत्तर पश्चिम बंगाल उपसागरात निर्माण झालेला दाब चक्रीवादळात रुपांतरीत होऊ शकतो. त्यानंतर हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या तटीय भागाला धडक देऊ शकतं. भारतीय हवामान विभागाकडून या दोन्ही राज्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आलाय.

हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुढच्या १२ तासांत या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ओडिशाच्या गोपालपूरपासून आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनम भागाला बसण्याची शक्यता आहे. तसंच गुलाब चक्रीवादळ आंध्र प्रदेशात कलिंगपटनममध्ये जमिनीला धडक देऊ शकतं.

cyclone Alert : पुढच्या १२ तासात महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना इशारा
Shubham Kumar: थेट अमेरिकेतून फोन… पंतप्रधानांकडून यूपीएससी टॉपर शुभमचं कौतुक

पश्चिम बंगाललाही तडाखा बसणार

या चक्रीवादळाच्या तडाख्यातून पश्चिम बंगालही सुटू शकणार नाही. बंगालमध्ये शनिवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पूर्व मिदनापूर आणि दक्षिण २४ परगना मध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता आहे.

सोमवारी दक्षिण बंगालमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावू शकतो. यासोबतच इथल्या नागरिकांना वादळालाही तोंड द्यावं लागू शकतं.

यासोबतच बंगालच्या उपसागरात आणखीन एक दाब तयार होण्याच्या परिस्थितीत दिसून येतोय. हा दाब बंगाल आणि बांग्लादेशच्या किनारी भागांना तडाखा देऊ शकतो. या दाबामुळे मंगळवारी पावसाला जोर मिळू शकतो. कोलकातासहीत दक्षिण बंगालच्या अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची चिन्ह आहेत.

IFS Sneha Dubey: संयुक्त राष्ट्रासमोर पाक पंतप्रधानांना तोंडावर पाडणाऱ्या IFS स्नेहा दुबे चर्चेत
India Pakistan: ‘आधी, POK रिकामा करा’, आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचं पाक पंतप्रधानांना प्रत्यूत्तरSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: