जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन स्वत:ची खुर्ची पंतप्रधान मोदींना देतात!


वॉशिंग्टन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची शुक्रवारी व्हाइट हाउसमध्ये भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीच्या सुरुवातीला दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक संवादही झाला. बराक ओबामा यांच्यासत्ताकाळात उपराष्ट्रपती असलेले जो बायडन सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे. उपराष्ट्रपती असताना त्यांनी भारत-अमेरिका संबंधाबाबत केलेल्या भाष्याचीही यावेळी आठवण करण्यात आली.

जवळपास दोन वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाइट हाउसमध्ये स्वागत करण्यात आले. अमेरिकेत सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच दौरा होता. त्यामुळे अनेकांचे लक्ष या भेटीकडे लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाइट हाउसमधील ओव्हल कार्यालयात दाखल झाल्यानंतर जो बायडन यांनी त्यांचे स्वागत केले.

pm modi visit to us : PM मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची बैठक; काय म्हणाले बायडन आणि मोदी? वाचा…
राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान मोदी यांना बैठकीसाठी असलेल्या खुर्चीकडे नेले. त्यावेळी बायडन यांनी जुन्या आठवणींना उजळा देत म्हटले की, मी उपराष्ट्रपती असताना या खुर्चीवर बसायचो. आता तु्म्ही या खुर्चीवर आसनस्थ व्हा, मी राष्ट्राध्यक्ष झालो आहे. बायडन यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हास्य उमटले. या खुर्चीवर बसणे हा माझा सन्मान असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. व्हाइट हाउसमध्ये केलेल्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदी यांनी बायडन यांचे आभार मानले.

pm modi joe biden : बायडन यांनी मोदींना सांगितला मुंबईतला किस्सा अन् सर्वच हसले!

हिंदी-पॅसिफिक महासागरात चीनला वेसण घालणार; ‘क्वाड’ गटाचा निर्धार!
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, आजची द्विपक्षीय शिखर बैठक महत्त्वाची आहे. आपण या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या सुरुवातीला भेटत आहोत. या दशकाला आकार देण्यात तुमचे नेतृत्व निश्चितपणे महत्त्वाची भूमिका बजावेल. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये मजबूत मैत्रीची बीजे पेरली गेली आहेत. भारत-अमेरिका संबंधांमध्ये व्यापार महत्त्वाची भूमिका बजावेल. महात्मा गांधींचा संदर्भ देत, पीएम मोदींनी ट्रस्टीशिपबद्दलच्या त्यांच्या संकल्पनांचा उल्लेख केला. जगभरातील आजची ही काळाची गरज आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: