school roof collapsed : विद्यार्थ्यांवर शाळेचं छत कोसळलं, २५ हून अधिक जखमी; अनेक विद्यार्थी गंभीर


सोनिपतः सोनीपतच्या गन्नौर येथील जीवानंद शाळेचं छत कोसळल्यानं गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. या घटनेत सुमारे २५ विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. तसंच छतावर काम करणारे तीन मजूरही गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर जखमी अवस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर बहुतेक विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, गंभीर जखमी असेलल्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी खानपूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

गन्नौरमधील जीवानंद शाळेचं छत पावसामुळे जीर्ण झालं होतं. यामुळे त्याचे बांधकाम देखील सुरू करण्यात आले. पण निष्काळजीपणामुळे शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना वर्गात बसवले. पण आज अचानक छत कोसळले. यात सुमारे २५ ते ३० विद्यार्थी गंभीर जखमी झाले आणि छताच्या बांधकाम करणारे तीन मजूरही गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी सुरेंद्र दून आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आलं. तर गंभीर जखमी-विद्यार्थ्यांना खानपूर पीजीआयमध्ये रेफर करण्यात आलं आहे.

Punjab Police: दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, पंजाबमध्ये तिघांना अटक

जीवन शाळेचं छत पावसामुळे जीर्ण झालं होतं. विद्यार्थी वर्गात बसलेले होते आणि छत कोसळलं. या घटनेत सुमारे २५ ते ३० मुलं आणि तीन मजूर जखमी झाले. या संपूर्ण घटनेची प्रशासकीय चौकशी केली जाईल. कोणाचा निष्काळजीपणा आहे आणि शाळा व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा समोर आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असं उपजिल्हाधिकारी सुरेंद्र दून म्हणाले. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

no entry for saree : साडी नेसून आल्यामुळे महिलेला रेस्टॉरंटमध्ये नो एन्ट्री! व्हिडिओ व्हायरलSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: