पाकिस्तानला धक्का; तालिबान मुद्यावरून ‘सार्क’ची बैठक रद्द


न्यूयॉर्क: ‘साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन’च्या (सार्क) परराष्ट्रमंत्र्यांची येत्या शनिवारी न्यूयॉर्क येथे होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. ‘सार्क’ देशांच्या बैठकीत तालिबानच्या तथाकथित सरकारच्या प्रतिनिधींनीही सहभागी व्हावे, अशी मागणी पाकिस्तानने केली होती. भारतासह इतर सदस्य देशांनी या मागणीस तीव्र विरोध नोंदविल्याने ही बैठक रद्द करण्यात आली.

तालिबानच्या सरकारला भारताने सद्यस्थितीत पूर्ण मान्यता दिलेली नाही. संयुक्त राष्ट्रांच्या काळ्या यादीतील अनेक दहशतवादी तालिबानच्या नव्या सरकारचे प्रतिनिधी आहेत. तालिबानच्या सरकारला जगातील प्रमुख देशांनीही अद्याप मान्यता दिलेली नाही, असे मुद्दे भारताकडून मांडण्यात आले. तालिबानच्या सरकारमध्ये अमीर खान मुत्ताकी हा परराष्ट्रमंत्री आहे.

ऑस्ट्रेलिया-अमेरिकेकडून धोका; मॅक्रॉन यांची PM मोदींसोबत चर्चा
गेल्या आठवड्यात ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या (एससीओ) बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तालिबान सरकार सर्वसमावेशक नसल्याचे विधान केले होते. या सरकारला मान्यता देण्यापूर्वी जगाने एकदा विचार करावा, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. काबूलमध्ये स्थापन झालेल्या या सरकारमध्ये महिला, अल्पसंख्याकांचा समावेश नसल्याचे मोदींनी म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘सार्क’मधील तालिबानच्या समावेशाला तीव्र विरोध नोंदविण्यात आला होता.

अफगाणिस्तान: महिला कल्याण मंत्रालय तालिबानकडून बंद

दक्षिण आशियातील बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांची ‘सार्क’ही संघटना आहे. या बैठकीत अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची खुर्ची रिक्त ठेवण्यात यावी, असे बहुतांश देशांनी म्हटले होते. मात्र, पाकिस्तानने त्याला विरोध केला. त्यामुळे अखेर ही बैठकच रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

तालिबानकडून उपमंत्री जाहीर; एकाही महिलेला स्थान नाही
पाकिस्तानचे म्हणणे काय?

‘सार्क’च्या सदस्य राष्ट्रांमध्ये २००७पासून अफगाणिस्तानचा समावेश करण्यात आला आहे. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीमध्ये अफगाणिस्तानचा प्रतिनिधी म्हणून तालिबान सरकारच्या परराष्ट्रमंत्र्यांचाही समावेश असावा, असे पाकिस्तानने म्हटले होते. मात्र, तालिबान सरकारच्या मान्यतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाल्यामुळे अखेर ही बैठकच रद्द झाली.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: