amarinder singh : ‘काँग्रेसमध्ये रागाला स्थान नाही, पण अपमान आणि छळासाठी आहे?’


चंदिगडः पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग ( amarinder singh ) हे सतत काँग्रेस हायकमांडला टीकेचं लक्ष्य करत आहेत. पक्षात झालेल्या अपमानाचा उल्लेख अमरिंदर सिंग यांनी आज पुन्हा केला. पक्षात आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक दिली जात असेल तर सामान्य कार्यकर्त्याचं काय होत असेल, असा सवाल त्यांनी केला.

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस प्रवक्त्या सुप्रीया श्रीनेत यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. पक्षात रागाला स्थान नाही, असं असं उत्तर त्यांनी अमरिंदर सिंग यांच्या टीकेला दिलं होतं. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांना अनुभव नसल्याचं म्हटलं होतं. नवज्योत सिंग सिद्धूंशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर यांनी ही टीका केली होती.

सुप्रीया श्रीनेत यांच्या टीकेला अमरिंदर सिंग यांनी ट्विट करून उत्तर दिलं. ‘हो, राजकारणात रागाला कुठलंली स्थान नाही. पण काँग्रेससारख्या इतक्या जुन्या पक्षात अपमान आणि छळ करण्यासाठी जागा आहे?’, असा प्रश्न त्यांनी केला. माझ्यासारख्या वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक दिली जातेय, सामान्य कार्यकर्त्यांसोबत काय होत असेल, असं कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले.

Amarinder Singh: राहुल-प्रियांका गांधींना ‘अनुभवहीन’ म्हणणाऱ्या ‘कॅप्टन’ला काँग्रेसचं प्रत्यूत्तर

पक्षात अपमान होत असल्याचं यापूर्वी अमरिंदर सिंग म्हणाले होते. तसंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूंविरोधात आगामी निवडणुकीत भक्कम उमेदवार रिंगणात उतरवू. एवढचं नव्हे तर सिद्धू देशविरोधी आणि धोकादायक आहे, असंही कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले होते.

navjot singh sidhu : ‘सिद्धू पंजाबचे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कुठल्याही त्यागासाठी मी तयार आहे’Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: