CSK win: चेन्नईचा सलग दुसरा विजय, विराटच्या संघावर ६ विकेटनी मात


शारजाह: आयपीएलच्या १४व्या हंगामात शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर ६ विकेटनी विजय मिळवला. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रातील चेन्नईचा हा सलग दुसरा विजय तर आरसीबीचा सलग दुसरा पराभव ठरला आहे. या विजयासह चेन्नईने गुणतक्त्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले. आरसीबीने विजयासाठी दिलेले १५७ धावांचे आव्हान चेन्नईने १९व्या षटकात ४ विकेटच्या बदल्यात पार केले.

वाचा- Video: वादळात धोनीने घेतली विराटची शाळा, IPLच्या मैदानावर वर्ल्डकपची तयारी

विजयासाठी १५७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईला ऋतूराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिस शानदार सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागिदारी केली. ही जोडी शतकाकडे जाईल असे वाटत असताना ९व्या षटकात चहलच्या चेंडूवर विराट कोहलीने अप्रतिम कॅच घेत चेन्नईला पहिला धक्का दिला. गायकवाड ३८ धावांवर बाद झाला. त्यानंतर १०व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलने फाफला ३१ धावांवर माघारी पाठवले. सलामीचे दोन्ही सेट फलंदाज बाद झाल्यानंतर मोईन अली आणि अंबाती रायडू यांनी धावांचा वेग कमी पडू दिला नाही.

वाचा- आयपीएलधोनी मागे पडला; या खेळाडूने IPL मधील मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला

अली-रायडूची जोडी जमली असताना हर्षल पटेलने अलीला २३ धावांवर बाद केले. त्यानंतर रायडूला ३२ धावांवर माघारी पाठवले. रायडू बाद झाल्यानंतर रैना आणि धोनी जोडीने संघाच्या विजयाची औपचारीकता पूर्ण केली. रैनाने नाबाद १७ तर धोनीने नाबाद ११ धावा केल्या.

त्याआधी वादळामुळे नाणेफेक होण्यास उशिर झाला होता. महेंद्र सिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धोनीने संघात कोणताही बदल केला नाही तर विराट कोहलीने दोन बदल केले होते.

वाचा- मुंबई इंडियन्सचा पराभव केला, तरी झाला २४ लाखांचा दंड

विराट आणि देवदत्त पडिक्कल यांनी संघाला शानदार सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागिदारी केली. प्रथम देवदत्तने आणि त्यानंतर विराटने अर्धशतक झळकावले. या दोघांनी चेन्नईच्या फलंदाजांची चांगली धुलाई केली. विराट कोहली ५३ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या धोकादायक एबी डिव्हिलियर्सला शार्दूल ठाकूरने १२ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर त्याने देवदत्तला ७० धावांवर बाद करून आरसीबीला तिसरा धक्का दिला. शार्दूलने चौथ्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्या.

त्यानंतर टीम डेव्हीडला चहरने माघारी पाठवले. त्याला फक्त एक धाव करता आली. तर ग्लेन मॅक्सवेलला ब्रावोने ११ धावांवर माघारी पाठवले. एकापाठोपाठ एक विकेटपडल्याने आरसीबीची अवस्था ५ बाद १५४ झाली. अखेरच्या चेंडूवर ब्रावोने हर्षल पटेलची विकेट घेत आरसीबीला १५६ धावात रोखले.

विराट आणि देवदत्त यांनी १३.२ षटकात १११ धावांची शानदार सुरूवात करून दिल्यानंतर देखील आरसीबीला मोठी धावसंख्या करता आली नाही. अखेरच्या १० षटकात त्यांना फक्त ६६ धावा करता आल्या आणि त्यांनी ६ विकेट गमावल्या.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: