काबूल: ‘या’ तीन देशांच्या विशेष प्रतिनिधींची तालिबानशी चर्चा


बीजिंग: चीन, रशिया आणि पाकिस्तानच्या विशेष प्रतिनिधींनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या अंतरिम सरकारमधील अधिकारी, तसेच हमीद करझाई आणि अब्दुल्ला अब्दुल्ला या अफगाण नेत्यांशी चर्चा केली.

सर्वसमावेशक सरकारची स्थापना, दहशतवादाशी मुकाबला आणि मानवतेचा मुद्दा यावर ही चर्चा झाल्याचे चीनमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. चीन, रशिया आणि पाकिस्तानचे तीन विशेष प्रतिनिधी या चर्चेसाठी काबूलला गेले होते. त्यांनी २१ आणि २२ सप्टेंबरला तालिबानचा हंगामी पंतप्रधान महंमद हसन अखुंद, परराष्ट्रमंत्री अमीर खान मुस्ताकी, अर्थमंत्री आणि अंतरिम सरकारमधील इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली, अशी माहिती चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी दिली. या तीन देशांच्या प्रतिनिधींनी अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई आणि अब्दुल्ला अब्दुल्ला यांचीदेखील भेट घेतली.

पाकिस्तानला धक्का; तालिबान मुद्यावरून ‘सार्क’ची बैठक रद्द
तालिबानने गेल्या महिन्यात अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर परदेशातील प्रतिनिधींनी प्रथमच करझाई यांची भेट घेतली.

अमेरिकेत करोना बळींची संख्या वाढली; बायडन प्रशासन चिंतेत

चीन, पाकिस्तान, इराण, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या अफगाणिस्तानच्या शेजारी देशांचा नवा गट तयार करण्यासाठी पाकिस्तान आणि चीन रशियासोबत काम करीत आहेत. या गटातील परराष्ट्र मंत्र्यांची ऑनलाइन बैठक सात सप्टेंबरला झाली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘बीबीसी’ला मंगळवारी दिलेल्या मुलाखतीत, ‘हा नवा गट एकत्रितपणे तालिबानच्या अंतरिम सरकारला मान्यता देण्याबाबत निर्णय घेईल,’ असे सांगितले होते.

ऑस्ट्रेलिया-अमेरिकेकडून धोका; मॅक्रॉन यांची PM मोदींसोबत चर्चा

‘अमेरिकेत अस्थैर्याची शक्यता’

अमेरिकेत ९-११ सारखा हल्ला पुन्हा होण्याची शक्यता गेल्या वीस वर्षांत कमी करण्यात आली आहे. मात्र, अफगाणिस्तानात तालिबानचा विजय झाल्याच्या पार्श्वभूमीर अमेरिकेत देशांतर्गत मूलतत्त्ववाद्यांना प्रेरणा मिळू शकते, असे अमेरिकेतील सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. वांशिक आणि राजकीय मुद्द्यांनी प्रेरित झालेल्या व्यक्तींकडून येणाऱ्या धमक्यांचा सामना एफबीआय करीत आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे संचालक ख्रिस्तिन अबिझेद यांनी सिनेटच्या अंतर्गत सुरक्षा समितीसमोर दिलेल्या साक्षीत ही माहिती दिली आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: